
मुंबई : राज्यात ३० जून २०२५ अखेर थकीत पीककर्जाची रक्कम ३७ हजार ३९२ कोटींवर पोहोचली आहे. महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास केलेली टाळाटाळ आता त्यांच्यासह जिल्हा बँकांसाठी अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे.