
आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यानंतर काँग्रेचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली.
मुंबई - आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यानंतर काँग्रेचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली. महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोरोना झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
अशात आता एक चांगली बातमी समोर येतेय. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर यशस्वी मात केलीये हे आपल्या सर्वांना माहितीये. त्याचप्रमाणे मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील कोरोनाला हरवलं आहे. महाविकास आघाडीतील कॅबिनेट मधील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यात. त्यानंतर त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयातून डिशचार्ज देण्यात आलाय.
मंत्री अशोक चव्हाण हे मुंबईतून नांदेडला गेले होते. नांदेडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत कार्यात अशोक चव्हाण मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. मागील महिन्याच्या २४ तारखेला म्हणजे २४ मे रोजी अशोक चव्हाण यांनी स्वतःची कोविड टेस्ट करून घेतली होती. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यानंतर अशोक चव्हाण यांना रस्ते मार्गाने मुंबईत हलवण्यात आलं होतं. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मोठी बातमी - 'हे' आहे कारण, म्हणून मुंबई वाचली निसर्ग चक्रीवादळाच्या महाविनाशकारी तडाख्यातून...
आता चौदा दिवसानंतर अशोक चव्हाण यांची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली. टेस्ट निगेटिव्ह आल्यांनतर अशोक चव्हाण यांना आज डिशचार्ज देण्यात आला. अशोक चव्हाण हे सध्या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आहेत. अशोक चव्हाण यांना आता १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे.
maharashtras ex congress cm ashok chavan recovers from covid 19