'हे सरकार आहे की तमाशा..?'; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल

'हे सरकार आहे की तमाशा..?'; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल "सगळं झाल्यावर काँग्रेस तलवारी म्यान करून चूप बसलं, कारण..." Mahavikas Aghadi is Government or Drama Devendra Fadnavis gets angry on CM Uddhav Thackeray
Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray-Together
Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray-Together

"सगळं झाल्यावर काँग्रेस तलवारी म्यान करून चूप बसलं, कारण..."

मुंबई: महाराष्ट्राच्या सरकारने यंदाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) हे केवळ २ दिवसांचेच असल्याचे जाहीर केले. ५ आणि ६ जुलैला पावसाळी अधिवेशन होईल असं सांगण्यात आले. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र नाराजी (Angry) व्यक्त केली. "एकीकडे राज्यातील विविध समाज आरक्षण (Reservation) आणि इतर प्रश्नांवर विशेष अधिवेशनाची मागणी करत आहे. तर दुसरीकडे राज्यातील नेतेमंडळीच स्वत: मोर्चे (Protests) काढताना आणि आंदोलनात (Agitation) सहभागी होताना दिसत आहेत. ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, ते निर्णय घेत नाहीत. कोर्टात राज्याची बाजू भक्कमपणे मांडत नाही. आणि कोर्टाने ताशेरे ओढले की आंदोलनात सहभागी होतात. हे सरकार आहे की तमाशा (Drama) आहे? असा संतप्त सवाल फडणवीस यांनी केला. (Mahavikas Aghadi is Government or Drama Devendra Fadnavis gets angry on CM Uddhav Thackeray)

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray-Together
दोन दिवसांचे अधिवेशन मान्य नाही- देवेंद्र फडणवीस

"केवळ दोन दिवसांचे अधिवेशन आम्हाला मान्य नाही. अशाप्रकारे सरकार जनतेच्या प्रश्नांची मुस्कटदाबी करणार असेल तर आम्हाला जनतेचा आवाज बनावंच लागेल. तीन पक्षात विसंवाद आहे, मतभेद आहेत हे स्पष्टच आहे. पण तुमच्या तीन पक्षांच्या भानगडीत तुम्ही जनतेला का खड्ड्यात टाकता आहात? तुम्ही एकमेकांना जोडे मारा किंवा हार घाला, पण तुमच्या राजकारणासाठी जनतेचा बळी देणे हे अत्यंत चुकीचे आहे", अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray-Together
TRP Scam: अर्णब गोस्वामींचे आरोपींमध्ये नाव

"मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री नाराज आहेत का नाही मला माहिती नाही, पण महाराष्ट्रातील जनता या लोकांवर नाराज आहे. ही सगळी तीन पक्षांची नौटंकी आहे. काँग्रेसने पदोन्नतीबद्दलची ताठर भूमिका घेतली. पण पदोन्नतीही झाली, जीआरदेखील निघाला. त्यानंतर काय झालं... तलवारी म्यान करून काँग्रेस चूप बसलं. कारण त्यांना सत्तेचा मलिदा खायचा आहे. कोणी काहीही भूमिका मांडत असले तरी हे सारे आतमधून सत्तेसाठी एकत्र आहेत", अशी टीका फडणवीस यांनी केली.

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray-Together
विजय शिवतारे ICU मध्ये असताना कौटुंबिक वादाची पोस्ट व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com