राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीची यादी सुपूर्द; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

तुषार सोनवणे
Friday, 6 November 2020

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीचे पत्र मंत्र्यांच्या गटाने दिले आहे. या पत्रातील उमेदवारांच्या यादीत तिन्ही पक्षातील 4-4 जणांचा सामावेश असणार आहे. 

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय चर्चेत आहे. राज्य सरकारकडून आज या उमेदवारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे पोहचतील अशी माहिती मिळत होती. त्यानुसार शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक, कॉंग्रेसचे अमित देशमुख हे राजभवनावर सायंकाळी पोहचले. 

विधिमंडळ लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीचे पत्र मंत्र्यांच्या गटाने दिले आहे. या पत्रातील उमेदवारांच्या यादीत तिन्ही पक्षातील 4-4 जणांचा सामावेश असणार आहे. मुख्यमंत्र्याकडून आलेला प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी हे मंत्री करणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या यादीतील 12 उमेदवारांसाठी काटेकोर नियम लावतील असा कयास आहे. उमेदवारांची नावे नियमबाह्य असतील तर नावे मंजूर केली जाणार नाहीत अशा सूचना राज्यपालांनी याआधीच दिल्या आहेत.

मराठा आरक्षणाविना वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, विद्यार्थ्यांचा गोंधळ

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणूकीसाठी राज्य सरकार दोन पर्यायांचा विचार करीत असल्याची माहिती मिळत आहे. दुसऱ्या पर्यायात राज्यपालांना उमेदवार नामंजूर करण्याची कोणतीही संधी मिळू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. समजा राज्यपालांनी उमेदवारांची यादी नाकारली तर, पर्यायी यादी महाविकास आघाडी तयार ठेवणार आहे. आज तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी राज्यपालांना उमेदवारांची यादी दिली आहे. त्यानुसार राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची यादी

 • एकनाथ खडसे
 • राजू शेट्टी
 • यशपाल भिंगे
 • आनंद शिंदे

कॉंग्रेस पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची यादी 

 • रजनीताई पाटील
 • सचिन सावंत
 • मुझफ्फर हुसैन
 • अनिरुद्ध बनकर

शिवसेना पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची यादी

 • उर्मिला मातोंडकर
 • नितीन बानुगडे पाटील
 • चंद्रकांत रघुवंशी
 • विजय करंजकर

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार 12 राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी आम्ही बंद लिफाफ्यात राज्यपाल महोदयांकडे सूपुर्द केली आहे. आम्हाला आशा आहे की, राज्यपाल महोदय लवकरच यावर निर्णय घेतील.

- अनिल परब,
मंत्री

 

Mahavikas Aghadi list prepared for Governor appointed MLAs Attention to the Governors decision

---------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi list prepared for Governor appointed MLAs Attention to the Governors decision