DCM ajit pawar oath esakal
मुंबई
Ajit Pawar : अजित पवारांचा अनोखा विक्रम; सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!
Mahayuti Swearing In Ceremony: या शपथविधीसह सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनण्याचा मान अजित पवार यांना मिळाला आहे. अजित पवार यांच्या या विक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
Ajit Pawar Took Oath As Deputy Chief Minister Sixth Time : विधानसभा निवडणूक निकालाच्या १३ दिवसांनंतर आज अखेर महायुती सरकारचा शपथविधी पार पडला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
