लॉकडाऊनमध्ये फळफळलं नशीब ! झालं असं काही की महेंद्र यांनी आपल्या दुकानाचं नावच ठेवलं 'लॉकडाऊन'

लॉकडाऊनमध्ये फळफळलं नशीब ! झालं असं काही की महेंद्र यांनी आपल्या दुकानाचं नावच ठेवलं 'लॉकडाऊन'

मुंबई : कुणाचं नशीब कुठे चमकेल हे काही सांगता येत नाही. जागतिक महामारीमध्ये माणसाच्या जीवावर बेतणारा कोरोना नावाचा विषाणू थोपवण्यासाठी देशभरात मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला.

सलग लॉकडाऊन लागल्याने अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र लॉकडाऊन कुणासाठी नशीबवान ठरावा हे ऐकून थोडं अजबच वाटेल. लॉकडाऊनमध्ये नशीब चमकले म्हणून घाटकोपरमधील भटवाडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र पोपटलाल छेडा या 66 वर्षीय व्यक्तीने दुकानाला "लॉकडाऊन फरसाण अँड स्वीट"हे नाव दिलंय. आता 'लॉकडाऊन' हेच नाव दिल्याने चर्चा तर होणारच. 

महेंद्र पोपटलाल छेडा हे भटवाडी परिसरात राहत असून त्यांचा टेम्पोचा व्यवसाय आहे. चेंबूरनाका येथे ते टेम्पो भाड्यावर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या महामारीने देशभरात थैमान घातलं. देशात कडक लॉकडाऊन करण्यात आला . या महामारीमध्ये सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना या महामारीचा मोठा सामना करावा लागला. यामध्ये लाखोंहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर शासनाने परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी व्यवसाय धंदे सुरू करण्याला परवानगी दिली. महेंद्र छेडा यांनी टेम्पोचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. मात्र छेडा यांचे वय 66 असल्याने चेंबूर येथील एका डिलिव्हरी एजन्सीने त्यांचा टेम्पो भाडे तत्वावर घेण्यास नकार दिल्याने छेडा यांना एक ते दीड महिना घरीच बसून काढावे लागले. टेम्पो असूनही भाडे मिळत नसल्याने अखेर महेंद्र छेडा यांनी टेम्पो मधून फरसाण विकण्यास सुरुवात केली.

टेम्पो भटवाडी परिसरात फिरतीवर ठेवून त्यांना या व्यवसायात मोठा नफा झाल्याचे छेडा यांनी सांगितले. दिवाळीनंतर परिस्थिती हळूहळू सावरत असल्याने महेंद्र छेडा यांनी हा व्यवसाय वाढवण्यासाठी भटवाडी येथे एक दुकान भाड्याने घेऊन तेथे फरसाण अँड स्वीट सुरू केले आहे. 6 हजार भाडे देऊन छेडा सध्या तिथे व्यवसाय करत आहे. टेम्पो भाड्यावर देऊन जितका नफा आजवर मिळत नव्हता तितका नफा लॉकडाऊनमध्ये फरसाणमध्ये मिळत असल्याने त्यात लॉकडाऊनमुळे या व्यवसायाची युक्ती मिळाल्याने महेंद्र छेडा यांनी दुकानाला 'लॉकडाऊन फरसाण अँड स्वीट' हे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. दुकानाच नवं कोरं नाव पाहून अनेकजण या दुकानातून फरसाण विकत घेत आहेत.

लॉकडाऊनमध्ये टेम्पोभाडे बंद पडल्याने एक ते दीड महिना घरीच बसून काढला. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होत असल्याने अखेर टेम्पोमधून फरसाण विक्रीला सुरुवात केली.  त्याला सकाळ संध्याकाळ दरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या व्यवसायात वाढ करण्यासाठी आता एक दुकान भाड्याने घेतले आहे. लॉकडाऊनमुळे या व्यवसायात फायदा झाल्याने दुकानाला लॉकडाऊन  फरसाण अँड स्वीट हेच नाव द्यायचे असा विचार माझ्या मनात आला. असं स्वतः महेंद्र यांनी सांगितलं. 

mahendra from ghatkopar got luck amid lockdown now started lockdown sweet mart

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com