महेश गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीचा इतिहास पुन्हा एकदा ताजा

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीचा इतिहास पुन्हा एकदा ताजा झाला आहे.
गुन्हेगारीला राजकीय बळ
गुन्हेगारीला राजकीय बळSakal

डोंबिवली : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीचा इतिहास पुन्हा एकदा ताजा झाला आहे.

जमीन, संपत्ती, पैसा यातून आतापर्यंत अनेक गुन्हेगारीच्या घटना या घडल्या आहेत. यात राजकारणी देखील मागे नसल्याची बाब काही घटनांमुळे अधोरेखीत होत आहे. राजकीय शर्यतीत पद, वर्चस्वासाठी हत्याकांडाच्या घटनांचा एक इतिहास महाराष्ट्राला राहीला आहे.

कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेने ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे जिल्हा हा गॅंगस्टर, गुंडांचा जिल्हा झाला आहे. तसेच एकेकाळी मुंबईतून तडीपार केलेल्या गुंडांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख होती,

त्यामुळे पूर्वीपासून येथे राजकीय वादातून हल्ल्याच्या घटनांचे सत्र कायम सुरुच आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरात राजकीय कारणामुळे कोणा कोणाच्या हत्या झाल्यात याबाबतचा एक आढावा...

कल्याण लोकसभेतील काही महत्त्वाच्या गोळीबाराच्या घटना

- 1986 साली शिवसेनेचे नेते व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी रमाकांत चव्हाण यांचा शहाड फाटक परिसरात खून

- 1989 साली आमदार पप्पू कलानी यांचे काका दूलीचंद कलानी यांचा खून

- 1990 साली घनश्याम भतीजा व इंदर भतीजा या दोन भावांचे तीन महिन्यांच्या अंतराने खून

- 1992 साली रिपाई नेते व रिक्षा संघटनेचे मारोती जाधव यांचा खून

- 1991 ते 95 या काळात श्याम जाड्या, राजन गुप्ता, लालूमल हेमदेव, नंदू बिल्डर, सुदेश भटीजा, कम्मू दादा यांचे खून, पोलिस अटकेत असलेल्या अण्णा शेट्टी याच्यावर गोळीबार, शेट्टी व दोन शस्त्रधारी पोलिसांचा मृत्यु

- 2000 साली उल्हासनगर येथे शिवसेनेचे नेते गोपाळ राजवानी यांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खून. (कॉंग्रेस नेते मोहन बहारानी, सुभाष मनसुलकर व दिपक गाजरिया यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले होते मात्र ते बचावले.)

- 2001 साली कल्याणचे नगरसेवक श्रीधर म्हात्रे यांची अज्ञात आरोपींनी निघृण हत्या केल्याने ठाणे जिल्हा हादरला होता.

- 2002 साली अंबरनाथ बदलापूर येथील ठाणे रिपाई जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांची हत्या करण्यात आली होती. गायकवाड यांचेच हस्तक असलेल्या इदिन सय्यद आणि त्याचा भाऊ पापा सय्यद यांनी ही हत्या केली होती

- 2008 साली शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर गोळीबार, यात म्हात्रे हे जखमी झाले होते. माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी हा गोळीबार केला होता.

- 2009 साली अंबरनाथ येथील नगरसेवकाचा भाचा समीर गोसावी याची हत्या करण्यात आली होती. तत्कालीन राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या विद्यमान भाजपात असलेल्या भालचंद भोईर आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही हत्या जागेच्या वादातून घडवण्याचा आरोप आहे.

- 2011 साली अंबरनाथ येथील नगरसेवक नितीन वारिंगे यांची हत्या (समीर गोसावी या हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या भालचंद भोईर यांनी सुपारी देऊन ही हत्या घडवल्याचा आरोप आहे.)

- 2011 साली अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला (नगरसेवक नितीन वारिंगे यांच्या हत्ये मध्ये वाळेकरांचा सहभाग असेल या संशयातून नितीन वारिंगे यांचे बंधू नगरसेवक पंढरीनाथ वारंगे यांनी सुपारी देऊन हल्ला केला होता.)

- 2012 साली नगरसेवक सलीम कुरेशी यांनी साथीदारांसह एका समाजसेवकाची हत्या केली होती. याप्रकरणी कुरेशी तुरुंगात आहेत.

- 2017 साली कॉंग्रेसचे नगरसेवक व सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची त्यांचा पुतण्या प्रशांत म्हात्रे याच्याकडून हत्या

- 2017 साली अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष उमेश गुंजाळ यांची हत्या

- 2017 विक्रांत केणे याच्यावर गोळीबार करत हत्या मंगेश भगत व त्याच्या काकांनी केली हत्या

- 2020 साली मनसेचे पदाधिकारी राकेश पाटील यांची हत्या

- 2022 साली अंबरनाथ येथे दिवसाढवळ्या पंढरीनाथ फडके यांच्याकडून राहूल पाटील आणि समर्थकांवर गोळीबार

- 2023 साली शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

- 2024 साली भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार

राजकीय वर्चस्व, राजकारणातील चढाओढ, मसल पॉवर यासोबतच मुंबई उपनगरातील ठाणे पासून पुढे बदलापूर अंबरनाथ पर्यंत जमिनीला आलेले सोन्याचे भाव, त्यातून उद्भवलेला संपत्तीचा वाद आदि गोष्टींमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत गेल्याचे दिसून येते. तसेच पोलीसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस कमी पडल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com