Video : जॅग्वार छे, आमची महिंद्राच भारी, तोऱ्यात गेली बघा पुढे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करत 'मलाही बोलेरो चालवायला आवडते. मुंबईच्या पाण्यात जेव्हा जॅग्वार अडकली होती, तेव्हा बोलेरो 'बॉस'सारखी पुढे निघून गेली.' 

मुंबई : काल (ता. 4) मुंबईसह, नवी मुंबई आणि उपनगरांत पावसाने थैमान घातले होते. मुंबई म्हणलं की, एक दिवस पाऊस पडला की तुंबून जाते. त्यामुळे जागोजागी पाणी साठून राहते. अशाच साठलेल्याल पाण्यात अनेकांचे भंबेरी उडते, तर अनेकांची फजिती होते. मुंबईच्या पाण्यात अशीच फजिती झाली एका 'जॅग्वार'ची!

श्रीमंत लोकांचं स्टेटस समजली जाणारी जॅग्वार ही कार मुंबईच्या पाण्यात अशी अडकली की, सगळेच तिच्या फजितीकडे बघतच बसले. ऐरोलीजवळ एका पुलाखाली पाणी साचले होते. जॅग्वार या पाण्यातून वाट काढून जण्याच्या प्रयत्नात होती. रस्त्याच्या मध्यापर्यंत आल्यानंतर ती मध्येच अडकली आणि तिथेच फसली. तेवढ्यात मागून एक 'महिंद्रा बोलेरो' येते आणि अगदी सहजपणे जॅग्वारच्या शेजारून वाट काढून जाते, आणि जॅग्वार जागची हालतही नाही.

यावर महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करत 'मलाही बोलेरो चालवायला आवडते. मुंबईच्या पाण्यात जेव्हा जॅग्वार अडकली होती, तेव्हा बोलेरो 'बॉस'सारखी पुढे निघून गेली.' 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. किंमत नाही, तर कामगिरी महत्त्वाची असा संदेश या व्हिडिओमार्फत दिला जातोय. तर विदेशीपेक्षा परदेशी मालच बेस्ट अशीही प्रतिक्रिया व्हायरल होता ना दिसतीये.  

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahindra bolero beats Jaguar in Mumbai floods video get viral