विरार - महानगरपालिका निवडणुकी पूर्वी बहुजन विकास आघाडीतून आउटगोइंग सुरु होती. तर आता महानगरपालिका निवडणुकीनंतर बहुजन विकास आघाडीत इनकमिंग सुरु झाली आहे. .भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या गळचेपीमुळे वसईतील भाजपच्या ज्येष्ठ कभाजपच्या जिल्हा सचिव, महाल मोर्चाचे विधानसभा प्रमुख ॲड. साधना धुरी यांनी आज (25 फेब्रुवारी) बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील,माजी महापौर नारायण मानकर व बविआचे ज्येष्ठ नेते जितूभाई शहा यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला..या प्रसंगी भाजपमधून बविआत महापालिका निवडणुकीपूर्वी प्रवेशकर्ते झालेले चंद्रशेखर धुरीहीउपस्थित होते.साधना धुरी यांच्या बरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. यावेळी साधना धुरी यांनी कोणाचं नाव न घेता खरे संघर्ष नेते हितेंद्र ठाकूर (आप्पा) असल्याचा टोला भाजप आमदारांना लगावला.या वेळी बोलताना ॲड. साधना धुरी यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, माझे बंधू चंद्रशेखर धुरी यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजपचे काम तळागाळात रुजवले. मात्र, ज्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचले, अशा निष्ठावंतांना आता डावलले जात आहे..मला ज्या भागातून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते, तिथे आठ-नऊ महिन्यांपूर्वी कॅनडाहून आलेल्या आणि कोणालाही परिचयाच्या नसलेल्या महिलेला तिकीट देण्यात आले, असा गौप्यस्फोट केला.भाजपच्या या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असून कार्यकर्त्यांनीच मला ही नाराजी व्यक्त करण्यासाठी सांगितले होते, असेही धुरी यांनी स्पष्ट केले.जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे, हे यावरून स्पष्ट होते, त्यामुळेच आता आम्ही बहुजन विकास आघाडीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले. साधना धुरी यांच्या पक्षप्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीची ताकद वाढली आहे..दरम्यान, ॲड. साधना धुरी यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना अजीव पाटील म्हणाले की, ॲड. साधना धुरी व चंद्रशेखर धुरी यांच्याकडून सातत्याने विकासकामांच्या बाबतीत विचारणा होत असे. आप्पांनी (हितेंद्र ठाकूर) शहरात केलेल्या कामांची ते नेहमीच प्रशंसा करायचे. राजकारण बाजूला ठेवून ते नेहमीच विधायक कामांसाठी सहकार्य करत असत..आप्पांच्या विचारांनी आणि कार्यपद्धतीने प्रेरित होऊनच त्यांनी आज बहुजन विकास आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी आप्पा हे पूर्णपणे सक्षम नेतृत्व आहेत, याची त्यांना खात्री पटली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल आणि त्यांना पक्षात योग्य तो सन्मान व न्याय दिला जाईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.