22 आणि 23 तारखेला मुंबईत अनेक भागात पाणी येणार नाही; तुमचा परिसर या लिस्टमध्ये आहे का?

22 आणि 23 तारखेला मुंबईत अनेक भागात पाणी येणार नाही; तुमचा परिसर या लिस्टमध्ये आहे का?

मुंबई,ता.18: अप्पर वैतरणा जलवाहीनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटच्या दुरुस्तीचे काम 22 डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे काम दुसऱ्या दिवशी  23 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत सुरु राहाणार आहे. या काळात एफ दक्षिण, एफ उत्तर, एम पुर्व, एम पश्चिम तसेच टी प्रभाग वगळता संपुर्ण मुंबईत 15 टक्के  पाणी कपात राहाणार आहे. त्याचबरोबर याच काळात घाटकोपर जलाशयातील 1400 मिमी व्यासाच्या जलवाहीनीवर झडप बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे घाटकोपर आणि कुर्ला भागातील मोठ्या भागात पाणी पुरवठा होणार नाही असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

  • शहर : ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण विभाग - 15 टक्के
  • पश्चिम उपनगरे : संपूर्ण पश्चिम उपनगरे 15 टक्के
  • पूर्व उपनग रेः एल, एन, एस विभाग - 15 टक्के

खालील भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील : 

एन विभाग – प्रभाग क्रमांक 123, 124, 126, 127, 128, 130  मधील आनंदगड, शंकर मंदीर, राम नगर, हनुमान मंदीर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षानगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी (वर्षानगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर , अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर१, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक 2, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर (आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी.  

एल विभाग – प्रभाग क्रमांक 156, 158, 159, 160, 161, 164 मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर 3, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी.

मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्यााचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच  महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

major water cut on 22nd and 23rd december in mumbai full water cut in N and L ward 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com