कोरोना तर वाढतोच आहे, मग प्रत्यक्ष शाळा सुरू करायच्या की नाही? शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना केल्या सूचना

तेजस वाघमारे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करायची की नाही, याबाबत शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला नाही. मात्र, शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना केली आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करायची की नाही, याबाबत शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला नाही. मात्र, शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना केली आहे. त्यानुसार आजवर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक न घेतलेल्या शाळांना आता बैठक घ्यावी लागणार असून शाळा सुरू करण्याची शिफारस शिक्षणधिकाऱ्यांकडे करावी लागणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनांना केराची टोपली! हफ्ते भरण्यासाठी फायनान्स कंपन्यांचा ग्राहकांवर दबाव

केंद्र सरकारने शाळा कधीपासून सुरु करता येतील, याबाबत पालकांची मते जाणून घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व राज्यातील शिक्षण सचिवांना शाळा सुरू करण्याविषयी पालकांना काय वाटते, हे जाणून घेण्याची सूचना केली आहे. तसेच राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर यापूर्वीच सोपविला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर शिक्षण विभाग प्रत्यक्ष शाळा करण्यासाठी तयारीला लागले आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांकडून माहिती मागविली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीनूसार शाळा सुरू करण्याची शिफारस शिक्षणाधिकाऱ्यांकडे करावी लागणार आहे.

मिशन ब्रेक द चेन! नवी मुंबईच्या आयुक्तांनी कोरोना विरोधात थोपटले दंड; 'ही' रणनिती तयार

पालकांशिवाय निर्णय?
शाळा व्यवस्थापन समितीमधील काही पालक गावी गेले आहेत. त्यामुळे काही शाळांच्या आतापर्यंत शाळा सुरू करण्याबाबत बैठकांच झालेल्या नाहीत. शाळांना शिक्षणाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवाव लागणार असल्याने मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी यांना बैठक घ्यावी लागणार आहे. मात्र, या बैठकीत पालक प्रातिनिधी उपस्थिती राहू न शकल्यास शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय उपस्थितांना घ्यावा लागणार असल्याचे, एका मुख्याध्यापकाने सांगितले.

---------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a proposal to start a school! Education officials instruct schools