Navratri: गरबा खेळताना मुलावर काळाचा घाला, धक्क्याने वडीलांनी घेतला अखेरचा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

man dies at hospital after dancing garba event father dies of mental shock in virar

Navratri: गरबा खेळताना मुलावर काळाचा घाला, धक्क्याने वडीलांनी घेतला अखेरचा श्वास

पालघर : ऐन नवरात्रीच्या उत्सावा दरम्यान एख ऱ्हदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गरबा कार्यक्रमात डान्स करताना मुलाचा मृत्यू झाला, दरम्यान मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्याने देखील प्राण सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मनीषकुमार जैन आणि नरपत जैन असं मुलगा आणि वडीलांचे नाव आहे. दरम्यान झालेल्या प्रकरामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शनिवारी रात्री सोसायटीत गरबा खेळताना मुलगा मनीषकुमार जैन याला अश्वस्थ वाटायला लागले, तेव्हा तात्काळ रिक्षातून विरार च्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले पण दवाखान्यात जाताच मुलगा रिक्षातून खाली पडला, हे रिक्षात असलेल्या वडिलांनी पाहिले आणि तेही चक्कर येऊन खाली पडले. रिक्षाने रुग्णालयात नेत असताना मुलगा कोसळल्याचं पाहून वडीलांनी प्राण सोडले. तर हॉस्पिटलमध्ये मुलालाही मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा: Shivsena : 'मन मोठं करून जसं शिवाजी पार्क दिलं तशी सत्ताही द्या'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालघरच्या विरारमध्ये एका गरबा कार्यक्रमात डान्स करताना ३५ वर्षीय तरुण खाली कोसळला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल कळल्यानंतर, त्या व्यक्तीचे वडील देखील कोसळले आणि रुग्णालयात त्यांचा देखील मृत्यू झाला. अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती अर्नाळा पोलीसांनी दिली आहे.

हेही वाचा: Affordable 5g Phone: 5G स्मार्टफोन घेताय? स्वदेशी कंपनीचा 'हा' सर्वात स्वस्त फोन आहे बेस्ट ऑप्शन

टॅग्स :Navratri