बायकोसाठी कायपण! विमानात बॉम्ब ठेवल्याचा पतीने केला कॉल; पुढे काय झालं जाणून घ्या?

bomb threat call: पत्नीला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाल्याने तिला फ्लाईट भेटावी यासाठी पतीने बॉम्ब ठेवल्याचा फोन कॉल केला होता
plane
planeEsakal

मुंबई- पत्नीला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाल्याने तिला फ्लाईट भेटावी यासाठी पतीने बॉम्ब ठेवल्याचा फोन कॉल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी विमान मुंबई ते बेंगळुरु येथे जाणार होते. पण, प्रशासनाला विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन कॉल आला होता.

एअरलाईन्सच्या मालाडमधील कॉल सेंटरला फोन आला होता. यात सांगण्यात आलं होतं की, प्लाईट क्रमांक QP 1376 मध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. हे विमान मुंबईतून सायंकाळी 6:40 वाजता बेंगळुरुकडे निघणार होते. पण, या फोन कॉलमुळे एकच खळबळ उडाली होती. (man from Bengaluru has been apprehended by the Mumbai police for allegedly making a bomb threat call)

plane
Delayed Flights:...तर एअरलाईन्सला रद्द करावी लागणार फ्लाईट; DGCA कडून मोठा बदल

संशयास्पद आढळलं नाही

फ्लाईटमध्ये १६७ प्रवाशी होते. फ्लाईट उड्डाण घेणार होती. पण, तेवढ्यात प्रशासनाला कळवण्यात आलं की विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन कॉल आला आहे. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानामातून उतरवण्यात आलं. दहशतवाद विरोधी पथक, क्राईम ब्रँच घटनास्थळी दाखल झाले. विमानाचा तपास करण्यात आला. तसेच प्रवाशांच्या सामानाची देखील छाननी करण्यात आली. पण, विमानात कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर उशिरा विमान प्रवाशांना घेऊन बेंगळुरुकडे पाठवण्यात आले.

सदर घटनेनंतर निलेश घोंगडे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर इन्स्पेक्टर मनोज माने आणि सब इन्स्पेक्टर स्वप्नील दळवी यांच्या नेतृत्त्वात तपास सुरु करण्यात आला होता. फोन कॉल करण्यात आलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून विलास बोकडे या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात आले.

plane
New Airline: आणखी एक विमान कंपनी भारतीयांच्या सेवेत दाखल; काय आहे नाव? जाणून घ्या

बायकोसाठी केलं

आरोपी बोकडेची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने कबुल केले की, तो बेंगळुरुतील एका कंपनीत काम करतो. त्याची बायको इंटेरियर डिझायनर असून ती मुंबईत एका क्लाईंटला भेटायला गेली होती. यावेळी तिला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला. याची माहिती तिने पती बोकडेला दिली. त्यामुळे बोकडेने कंट्रोल रुमला फोन करुन विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. दरम्यान, पत्नीला त्याच विमानात बसवण्यात आले नाही, तिच्यासाठी दुसरी व्यवस्था करण्यात आली होती. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com