मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेशी गैरवर्तन, टवाळखोर मागून आला आणि...

 crime
crimeesakal

महिलांसोबत अश्लील वर्तनाच्या घटना वाढत असल्याचं चित्र आहे. वसईत पहाटेच्या वेळी असाच प्रकार समोर आला आहे. सध्या राज्यभरात थंडी वाढल्याने अनेकजण सकाळी व्यायामाला बाहेर पडत आहेत. पण वसईत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेची एकाने छेड काढली. (vasai crime news)

या टावळखोराने मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग केला. यानंतर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यावर स्थानिकांनी या नराधमालाा चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. पालघरच्या वसईत पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. (Vasai Crime)

महिला वॉक करत असतानाच तो मागून आला आणि...

वसईतील सनसिटी भागात महिला मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली. काही अंतर चालल्यानंतर एकजण तिचा पाठलाग करू लागला. यानंतर त्याने महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. वसई पश्चिम भागात हा प्रकार समोर आला आहे.

संबंधित महिलेने हा प्रकार समोर आणल्यानंतर काही स्थानिकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूने चालणाऱ्यांनी या व्यक्तीला घेरला आणि चोप दिला. यानंतर माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आलं. (Manikpur Police)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com