esakal | डोंबिवली पाठोपाठ भाईंदरमध्ये मुलीवर बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

डोंबिवली पाठोपाठ भाईंदरमध्ये मुलीवर बलात्कार

sakal_logo
By
दीनानाथ परब

भाईंदर: राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. काल डोंबिवलीत (dombivali) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape) झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. आता भाईंदरमध्येही (Bhayandar) अशीच घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवरील (minor girl )बलात्कार प्रकरणात भाईंदरमध्ये २२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवघर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात आयपीसीच्या कलम ३७६ एबी, ३६३, ५०६ आणि पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

काल डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराने एकच खळबळ उडाली होती. तब्बल 29 जणांनी तिच्यावर गेल्या 8 महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार (rape) केल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांच्या (Manpada police) चार पथकांनी 23 आरोपींना अटक करत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती गुरुवारी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

loading image
go to top