

Navi Mumbai Politics
esakal
Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वनमंत्री गणेश नाईक हे भाजपचेच आहेत का, याची डीएनए टेस्ट करायला हवी, असा खोचक टोला भाजप नेत्या आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी लगावला आहे. म्हात्रे यांच्या या टीकेला नाईक यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.