
मोखाडा : मोखाड्यातील शेतकर्यांना खरीपाचे शेती हेच एकमेव ऊत्पन्नाचे साधन आहे. त्यानंतर फळबाग लागवडीत मुख्य आंबा पीक घेतले जाते. आता आंब्याचा मोहोर बहरू लागला आहे. मात्र, ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावाने आंबा मोहोर गळुन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आता आंबा मोहोर कसा वाचावायचा, या संकटात फळबागायतदार सापडले आहेत.