झुरळाची जाहीरात कंपनीच्या अंगलट; मागितली महिलांची माफी

cockroach advertisement
cockroach advertisementsakal media

मुंबई : झुरळाला घाबरलेली गृहिणी (housewife) घरात काम करणाऱ्या सुताराच्या अंगावर, पतीसमोरच उडी मारते, या जाहिरातीबद्दल (cockroach advertisement) संबंधित कीटकनाशक कंपनीने (company) सर्व महिलांची माफी (apologize) मागितली आहे. या जाहिरातीला शिवसेना आमदार मनीषा कायंदे (manisha kayande) यांनी आक्षेप घेतला होता.

cockroach advertisement
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत; १२ वर्षांखालील चार मुलांचा समावेश

स्त्रीया झुरळाला घाबरून पतीच्या उपस्थितीत श्रमिकाकडे मदतीला जातात ही संकल्पना स्त्रीयांचा अवमान करणारी आहे. ही जाहिरात स्त्रीयांना घाबरट दाखविणारी आहे, असा आक्षेप श्रीमती कायंदे यांनी घेतला होता. त्यामुळे या जाहिरातीबद्दल सर्व महिलांची माफी मागत असल्याचे पत्र हे कीटकनाशक बनविणाऱ्या मिडास हायजीन इंडिया लि. या कंपनीने श्रीमती कायंदे यांना दिले आहे.

काही दिवसांपूर्वी ही जाहिरात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यावर श्रीमती कायंदे यांनी त्याला आक्षेप घेतला होता. या जाहिरातीविरुद्ध त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तसेच अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिलकडेही दाद मागितली होती. जाहिरातीचे प्रसारण थांबवावे तसेच कंपनीने सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे ही जाहिरात यापुढे न दाखविण्याचे आश्वासन कंपनीने दिल्याचा दावा कायंदे यांनी केला आहे.

midas hygiene company
midas hygiene companysakal media

ही जाहिरात सादर करीत असताना महिलांचा किंवा रामायणातील लक्ष्मणरेषा या संकल्पनेचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. आपली हिंदू संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे तसेच आपण माताभगिनीही आम्हाला तितक्याच वंदनीय आहात. आम्ही स्त्रीयांचा आदर करतो व यापुढेही करत राहू. त्यामुळे या दृष्याने आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल आम्ही आपली जाहीर माफी मागत आहोत, असे कंपनीच्या व्यवस्थापकांनी कायंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आज एकविसाव्या शतकात स्त्री पुरुष समान नाहीत हेच या जाहिरातीत अधोरेखित केले होते. सायना नेहवाल, मेरी कोम, मीरा कुमारी सारख्या भारतीय महिला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकून भारताचे नाव जगात उज्वल करीत आहेत. अशा स्थितीत जाहिरातीतील महिलांना कमकुवत दाखवून आपले उत्पादन विकण्याचा प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही असा इशारा कायंदे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com