मानखुर्द आग: बेकायदा गोदामांचे ऑडिट होणार? महापौरांनी दिले संकेत

मानखुर्द आग: बेकायदा गोदामांचे ऑडिट होणार? महापौरांनी दिले संकेत

मुंबई: मानखुर्द मंडाळे येथील बेकायदा गोदामांचे ऑडिट होण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिणार आहे. तसेच या परिसरातील भूमाफियांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

मानखुर्द मंडाळे येथील गोदामांना लागलेल्या आगीमुळे येथील धोका पुन्हा अधोरेखीत झाला होता. सात महिन्यांपूर्वी जून 2020 मध्येही याच ठिकाणी आग लागली होती. शुक्रवारी लागलेल्या आगीत बेकायदा ऑईलच्या ड्रमचा स्फोट होत असल्याने आग वेगाने पसरत होतीच. त्याच बरोबर आगीवर नियंत्रण मिळवण्यातही अडचणी येत होत्या. या आगीचा अहवाल अग्निशमन दलाकडून तयार होणार आहे.

महापौर किशोरी पेडेणकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांना पत्र पाठवून या परिसरातील बेकायदेशी उद्योगांचे, गोदामांचे ऑडिट करण्याची सूचना करणार असल्याचे सांगितले. हे ऑडिट झाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल असेही महापौरांनी सांगितले.

या परिसरात भूमाफीयांचा सुळसुळाट आहे, अशी तक्रार आगीच्या वेळी स्थानिक नागरिकांनी केली. असल्या प्रकारामुळे नागरिकांमध्येही दहशत आहे. याबाबतही पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनाही पत्र लिहिणार आहे. या भूमाफीयांचा बंदोबस्त करण्याची सूचना त्यांना करु असेही महापौरांनी सांगितले.
 
या आगीच्या ठिकाणी आज कुलिंग ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर उद्या किंवा सोमवार पासून अहवाल तयार करण्याच काम सुरु होईल असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या अहवालात स्थानिकांच्या जबान्याही घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mankhurd Illegal warehousesaudited  Kishori Pednekar write letter District Collector

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com