मुंबई : राम नवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत वाद, दोन जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ram navami bike rally clash two groups injured mumbai police
मुंबई : राम नवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत वाद, दोन जखमी

मुंबईत रामनवमीच्या मिरवणुकीत वाद, दोन जखमी

मुंबईतील मानखुर्द परिसरात राम नवमी निमित्त आयोजित मिरवणुकीत वाद झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद झाल्याचे वृत्त असून परिसरात दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. मानखुर्दच्या पी एम जी पी परिसरात रविवारी राम नवमी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, दोन गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. घटनेनंतर पोलीस तसेच दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. बाईक रॅली दरम्यान म्हाडा वसाहतीत दोन गटात वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात दोन जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा: दोन वर्षानंतर रामनवमीचा जल्लोष, पहा शोभायात्रेचे खास PHOTO

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांनी देखील यासंबंधी ट्विट केले आहे.पी एम जी कॉलनी परिसरात तणावपूर्ण वातावरण असल्याचे समजते. पोलिसांनी तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, अशी विनंती त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांना टॅग करत केलीय.

Web Title: Mankhurd Ram Navami Bike Rally Clash Two Groups Injured Mumbai Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top