अखेर मनसुख हिरेन यांचा डायटॉम रिपोर्ट समोर, धक्कादायक माहिती उघड

अखेर मनसुख हिरेन यांचा डायटॉम रिपोर्ट समोर, धक्कादायक माहिती उघड

मुंबई:  मनसुख हिरेन यांचा अखेर शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या (NIA) हाती हा अहवाल लागला आहे. हिरेन यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

मनसुख हिरेनचा डायटॉम रिपोर्ट समोर आला आहे. डायटॉमचा अहवाल आल्यानंतर एटीएसचे वरिष्ठ अधिकारी सतर्क झाले आहेत. थोड्या वेळातच एटीएसचे वरिष्ठ अधिकारी ठाणे एटीएसमध्ये पोहोचत आहेत. अहवालाची पुन्हा तपासणी देखील केली जाण्याची शक्यता आहे.  या रिपोर्टनुसार त्याच्या शरीरात फुफुसात पाणी भरलेलं आढळून आलं आहे.

काय आहे डायटॉम रिपोर्ट

त्यांच्या माहितीनुसार, खाडी, नदीमध्ये एक डायटॉम नावाचा एक केमिकल पदार्थ आढळतो. ज्यावेळी कुणी व्यक्ती पाण्यात बुडतो. त्यावेळी तो श्वास घेऊ शकत नाही. त्यावेळी नाका, तोंडावाटे  त्याच्या शरीरात पाणी जाते. त्यानंतर त्याचा रक्तप्रवाह बंद होतो आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरात डायटॉम नावाचे केमिकल आढळते. जर का कुणी संबधित व्यक्तीला मारून फेकले जाते. त्यावेळी त्याच्या शरीरात डायटॉम हा पदार्थ आढळून येत नाही.

सचिन वाझेंचा मोबाईल आणि डिजिटल पुरावे NIAच्या ताब्यात
 
एनआयएनं सचिन वाझे यांच्या सीआययू कार्यालयात एनआयएने शोध मोहिम राबवली असून वाझे यांचा मोबाईलसह कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत गुन्हे शाखेच्या सात पोलिसांची चौकशी एनआयएने केली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. तर, तपास सुरु असतानाच एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. एनआयए मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे प्रकरणात एका इनोव्हा कारची माहिती समोर आल्यानंतर आता एक मर्सिडीज कार जप्त केली आहे. या कारमधून वाझे हे मनसुख हिरेनला भेटले असून त्यावेळी स्कॉर्पिओ कारच्या चाव्या हिरेनकडून घेतल्या असल्याचा एनआयएला संशय आहे. प्रत्यक्षात ही कार चोरी झालीच नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरील आहेत. या मर्सिडीजमध्ये मनसुख हिरेन बसले होते, असे समोर आले आहे. 

सीसीटीव्हीनुसार, मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत होते. त्यानंतर काही वेळानंतर ही मर्सिडीज कार आली आणि त्यात बसून ते निघून गेले. ती कार वाझे हेच वापरत असल्याचा एनआयएनला संशय आहे. एनआयएच्या अधिका-यांनी या कारची तपासणी केली. त्यात काही शर्ट, पैसे आणि  बाटली (ज्यामध्ये पाणी अथवा रॉकेल आहे.)सापडली आहे. याच कारमधून पीपीई किटही नेण्यात आल्याचा संशय आहे.

Mansukh Hiren diatom report has finally come to nia

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com