esakal | मुंबईत सोमवारी मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा; छत्रपती संभाजीराजे राहणार उपस्थित
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत सोमवारी मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा; छत्रपती संभाजीराजे राहणार उपस्थित

मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी 26 ऑक्टोबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

मुंबईत सोमवारी मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा; छत्रपती संभाजीराजे राहणार उपस्थित

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी 26 ऑक्टोबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही मालिकांच्या अभिनेत्रींची सूटका

मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने मराठा समाज एकत्रित येणार आहे. या ठिकाणी 11 वाजता आक्रोश आंदोलन पुकारण्यात येणार आहे. गेल्या दीड महिण्यापासून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. तरीही सरकारकडून मराठा बांधवांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना समाजात आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न अडकला असताना राज्य सरकारकडून अद्यापही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

आज मुख्यमंत्री मास्क काढून बोलतील: संजय राऊत

दरम्यान, सरकारकडून पोलिस आणि उर्जा विभागात भरतीचे नियोजन करण्यात आले. जाणीवपूर्वक मराठा समाजाला नोकरीपासून वंचित ठेवण्यासाठी हे केले जात असल्याच्या तीव्र भावना मराठा तरुणांकडून व्यक्त केल्या जात आहेत. या भरती प्रक्रिया म्हणजे मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सरकारने करू नये असेही पवार यांनी सांगितले.