मुंबईत पुन्हा 'एक मराठा लाख मराठा'; तब्बल २० ठिकाणी एकत्र ठिय्या आंदोलन

सुमित बागुल
Sunday, 20 September 2020

आमचा अंत दोन्ही सरकारांनी पाहू नये, लवकरात लवकर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी आणि मराठा समाजाला न्याय आणि त्यांचे हक्क द्यावेत

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर मराठा समाजामध्ये संतप्त भावना आहेत. याच भावनांना वाट करून देण्यासाठी आज मुंबईत तब्बल २० ठिकाणी  मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संवेदनशील परिथितीत सोशल डिस्टंसिंग आणि इतर खबरदारी घेत मुंबईत एकाच वेळी तब्बल २० ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

कुठे होणार आंदोलन ? 

मुंबईतील दादर, कुर्ला, वडाळा, लालबाग, चेंबूर, वरळी, गिरगाव, वांद्रे सांताक्रूझ अशा तब्बल वीस ठिकाणी हे आंदोलन करण्यात येतंय. एकाच वेळी २० ठिकाणी आंदोलन होत असल्याने मुंबईत सगळीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय.    

महत्त्वाची बातमी - उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे एकाच ठिकाणी आंदोलन न करता २० ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. कमीत कमी मराठा नागरिकांना एकत्र करून शासनापर्यंत माध्यमांमार्फत मागण्या पोहोचवण्याचा विचार करून, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगचं पालन करून, संपूर्ण काळजी घेत आंदोलन केलं जातंय. कोरोना संकट काळामुळे कमीत कमी मराठा नागरिकांना मुद्दाम बोलावण्यात आलंय. नाहीतर मुंबईत हजारोंचा जनसमुदाय पाहायला मिळाला असता असं आंदोलकांकडून सांगितलं गेलं.

काय आहेत मागण्या ? 

राज्य किंवा केंद्राने काहीही करावं पण आमचं आरक्षण टिकलं पाहिजे असं या आंदोलक नेत्यांचं म्हणणं आहे.सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर स्थगिती आलीये. दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन मराठा आरक्षण टिकलं नाही तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल. आमचा अंत दोन्ही सरकारांनी पाहू नये, लवकरात लवकर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी आणि मराठा समाजाला न्याय आणि त्यांचे हक्क द्यावेत ही मागणी आजच्या या आंदोलनातून केली जातेय. 

maratha community starts agitation on twenty different places in mumbi for reservation 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha community starts agitation on twenty different places in mumbi for reservation