सुरक्षेच्या कारणास्तव मराठा समाजाचा 'मशाल मार्च' अडवला; मुख्यमंत्र्यांवर आंदोलकांचे टीकास्त्र

सुरक्षेच्या कारणास्तव मराठा समाजाचा 'मशाल मार्च' अडवला; मुख्यमंत्र्यांवर आंदोलकांचे टीकास्त्र

मुंबई - मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आज सायंकाळी 'मशाल मार्च'चे आयोजन केले होते. या 'मार्चचे नेतृत्व शिवसंग्राम चे अध्यक्ष विनायक मेटे करत होते. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' पर्यंत मार्च काढण्यात आला होता. 

आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटावं किंवा मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधींनी भेटवं अशी आंदोलकांची इच्छा होती. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने, आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. अखेर मंत्री अनिल परब यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेण्याचे मान्य केले. मुंबईतील कायदा सुव्यवस्था उपायुक्त विश्वास नागरे पाटील यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाच्या मागण्याचे निवदेन अनिल परब यांना देण्यात येणार आहे.

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या

1. श्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती बरखास्त करण्यात यावी.
मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील असलेली उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी. या नव्या समितीवर अध्यक्ष म्हणून श्री एकनाथ शिंदे वा श्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करावी.

2. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाचे स्थापन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापिठाची स्थापना करणे, घटनापीठासमोर सरकारची बाजू मांडण्यासाठी तज्ञ आणि नामांकित वकिलांची नियुक्ती करणे, आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी तसा अर्ज करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करणे, इत्यादी गोष्टींवर त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.

३. मराठा समाजाला SEBC चे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांना आरक्षणाच्या सवलती द्याव्यात व वयाच्या आणि इतर तत्सम अटी व शर्थी शिथिल करण्यात याव्यात.
    सध्या मराठा समाजाला आरक्षण नसल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही सवलती नसल्याने नुकसान होत आहे. त्याबाबत या सरकारने निर्णय घेऊन मराठा समाजाला दिलासा देणे, मराठा विद्यार्थ्यांना सवलत देण्यासाठी सुपर न्यूमरी पद्धतीने जागा वाढवणे वा EWS सारख्या पण SEBC असलेल्या सवलतीच्या प्रमाणात, वा अन्य कुठल्याही पद्धतीने मराठा विद्यार्थ्यांचे ह्या २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षात नुकसान होणार नाही असा निर्णय तात्काळ घेऊन त्याची त्वरित अंमलबजावणी करावी.

४. मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा मुलांना स्थान द्यावे व शेवटची तारीख वाढवण्यात यावी.
राज्यामध्ये मेडिकल प्रवेश सुरू झाले आहेत व त्यासाठी शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. मराठा मुलांना SEBC मधून, OPEN मधून वा EWS प्रवर्गातून अर्ज करायचे याबाबत कुठलीही स्पष्टता नाहीये, त्यासंबंधात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे प्रवेशाची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर आहे ती किमान ८ दिवसांनी वाढवण्यात यावी.

५. ११ वी, व इतर टेक्निकल अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. सदरची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला न्याय द्यावा.

६. २०१४ चे ESBC व २०१८-१९-२० च्या SEBC मधील मराठा तरुणांची नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण होऊनही ज्यांना नियुक्ती मिळाली नाही अशा सर्वांचे त्वरित नियुक्ती आदेश देण्यात यावेत.

७. तांबडी, ता. रोहा, जि. रायगड, दोंडाईचा, हिंगणघाट येथील पीडित कुटूंबियांना न्याय देऊन आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी.

८. कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशी होण्यासाठी उच्च न्यायालयात प्रयत्न करून सदरच्या शिक्षेची अंमलबजावणी करून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा.

९.    मराठा क्रांती मोर्चाच्या विविध आंदोलनात मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.

-------------------------------------------------


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com