Maratha Kranti Morcha : वाशीत आजही बंद

नेताजी नलवडे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

तसेच शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जाणीवपूर्वक
पोलिस प्रशासन जर कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असेल तर आंदोलन अधिकच उग्र होईल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

वाशी : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर वाशी शहरात शुक्रवारी (ता. १०)
मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

गुरुवारी (ता. नऊ) शहरातील काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून आरक्षणाची मागणी केली होती. शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला. तरीही पोलिस प्रशासनाने कार्यकर्त्यांविरोधात चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. याचा निषेध म्हणून शुक्रवारी दुसऱ्या दिवशी वाशी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

तसेच शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जाणीवपूर्वक
पोलिस प्रशासन जर कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असेल तर आंदोलन अधिकच उग्र होईल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, अटक केलेल्या कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाकडून मारहाण केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.

तसेच चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाची धार तीव्र होईल, असेही आंदोलकांत चर्चा सुरू आहे. दरम्यान शहरात सध्या तणावपूर्ण
शांतता असून व्यापारी दुकाने बंद आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha In washi today is also bandh