अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यालयाचं दादरमध्ये तात्पुरतं स्थलांतर

maratha mahasangh
maratha mahasanghsakal media
Updated on

मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ( क्षत्रिय मराठा समाज ) कार्यालयाच्या (maratha mahasangh office) गिरगाव (girgaon) येथील इमारतीचे नूतनीकरण (building reconstruction) होत असल्यामुळे तात्पुरते नवीन कार्यालय (new office) दादरच्या शिवाजी मंदिरात (dadar shivaji temple) स्थापन करण्यात आले आहे.

प्रार्थना समाज येथे मराठा महासंघाचे कार्यालय किमान एकशेवीस वर्षे आहे. आता इमारत नूतनीकरणामुळे हे कार्यालय शिवाजी मंदिरातील शिवनेरी सभागृहात स्थलांतरित झाले आहे. नुकत्याच झालेल्या त्याच्या उद्घाटनासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, अखिल क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र मंत्री प्रेमपाल सिंह, संयुक्त सरचिटणीस दिलीपसिंह जगताप, महासंघाचे खजिनदार एस. आर. सावंत, प्रवीण मंत्री, समीर कदम, मराठा क्रांतीमोर्चाचे युवानेते विरेंद्र पवार, मुंबई प्रदेश अध्यक्ष महेश सावंत, जयवंत विचारे, सुनील नलावडे, ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे नाका कामगार आघाडी सांभाळणारे सचिव राजेंद्र बोराडे, संघटक सचिव विजय पात्रे, कार्यालयीन प्रमुख लता निकम व अंगणवाडी सेविका दीपाली आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या गिरगांव येथील नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ 19 ऑगस्ट रोजी सकाळी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com