ठाकरे सरकार मराठा समाजावर अन्याय करतंय; MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर भाजपचा हल्लाबोल

ठाकरे सरकार मराठा समाजावर अन्याय करतंय; MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर भाजपचा हल्लाबोल

मुंबई  : आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी मराठा समाजातील 739 तरुणांची (एसईबीसी) लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया पूर्ण झाली असताना त्यांना सरकारी सेवेत का नियुक्ती दिली जात नाही? या तरुणांवर सरकार अन्याय करत आहे, त्यांना तातडीने न्याय द्या, अशी विनंती भाजप नेते तथा आमदार ऍड. आशीष शेलार यांनी केली. 

मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात गेले 12 दिवस उपोषण करीत असून, आज ऍड. आशीष शेलार यांनी भेट घेतली. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. या तरुणांचे म्हणणे ऐकल्यावर तसेच त्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार शेलार यांनी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दूरध्वनीवरून संपर्क करून या तरुणांच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या. 

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी लोकसेवा आयोगाने परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या या 739 उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून प्रक्रिया पूर्ण केली होती तर मग त्यांना नियुक्ती का दिली जात नाही? याच काळात छाननी झालेल्या काही उमेदवारांना अन्य खात्यात नियुक्ती दिली गेल्याचे समजते. मग या 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करते आहे? अन्य समाजाला जसा सरकारने न्याय दिला तसाच न्याय मराठा समाजातील तरुणांना मिळावा. कुणावरही अन्याय होणार नाही अशी समान न्यायाची भूमिका सरकारने घ्यावी, अशी विनंती आमदार शेलार यांनी मुख्य सचिवांना केली. दरम्यान, या तरुणांचे निवेदन स्वीकारून त्याबद्दल सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार शेलार यांनी दिली.

Maratha reservation BJP leader Ashish Shelar criticizes Thackeray government for doing injustice to Maratha community

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com