
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचा निकष लावून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण आता तिसऱ्या दिवशीही तीव्र स्वरूप धारण करत आहे. आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. या आंदोलनाला राज्यभरातील मराठा बांधवांचा पाठिंबा मिळत असून, आंदोलकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था समाजबांधवांकडून केली जात आहे. मात्र, उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने चिंता वाढली आहे.