
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या उपोषणाला आज दुसरा दिवस आहे. कालपासून मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले असतानाही मराठा आंदोलकांचा उत्साह आणि निश्चय अजिबात ढळलेला नाही. "दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर पाणीत्याग करू," असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, आंदोलकांनी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनवर मुक्काम ठोकला, जिथे त्यांनी "एक मराठा, लाख मराठा"च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.