esakal | अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याचे दहशतवादी संघटनेची कबुली; समाजमाध्यमांवर पत्रक केले व्हायरल

बोलून बातमी शोधा

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याचे दहशतवादी संघटनेची कबुली; समाजमाध्यमांवर पत्रक केले व्हायरल}

दहशतवादी संघटनेने अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याचे दहशतवादी संघटनेची कबुली; समाजमाध्यमांवर पत्रक केले व्हायरल
sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन भरलेली कार आढळून आली होती. मोठा स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकाराची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश उल हिन्दने स्विकारली आहे. समाजमाध्यमांवर या संघटनेने अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवल्याची जबाबदारी स्विकारली आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील इस्त्राईलच्या राजदूतावसाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारीही जैश उल हिन्द या संघटनेने स्विकारली होती. या संघटनेने अंबानी यांच्याकडे पैशाची मागणी केली आहे. संबधीत घटनेची जबाबदारी दहशतवादी संघटनेने स्विकारली असल्याची माहिती अद्यापतरी सरकारी सुत्रांकडून मिळालेली नाही.

marathi crime jaish ul hind claims responsibility placing explosives mukesh ambani house mumbai crime news