

Uddhav Thackeray Raj Thackeray alliance
esakal
मुंबईसह राज्यातील सात नगरपालिकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. दोन्ही भावांसाठी मुंबईची महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई आपल्या हातातून जाऊ नये यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. मात्र युतीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला कसा राहील आणि शरद पवार यांचा पक्ष जर युतीत सामील झाला तर जागावाटपाचा पेच कसा सुटेल, याबाबत सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनाबाबत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.