esakal | मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नवीन गृहनिर्माण धोरण आणणार
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नवीन गृहनिर्माण धोरण आणणार

पाच वर्षांत मुंबईबाहेर परवडणाऱ्या दरातील सदनिका उभारण्यासाठी सुमारे 5 हजार एकर जमीन उपलब्ध करण्याचा माझा मानस आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नवीन गृहनिर्माण धोरण आणणार

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई  : म्हाडाच्या मुंबईतील जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करून परवडणाऱ्या दरातील घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. म्हाडाचे पंख अधिक विस्तारण्यासाठी गृहनिर्माण धोरण तयार केले जात असून येत्या पाच वर्षांत मुंबईबाहेर परवडणाऱ्या दरातील सदनिका उभारण्यासाठी सुमारे 5 हजार एकर जमीन उपलब्ध करण्याचा माझा मानस आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये 22 पात्र भाडेकरूंना सदनिका वितरित करावयाची सोडत जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्यासह अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते. 
आदित्य ठाकरे म्हणाले, की आजचा क्षण मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. कारण मुंबईच्या जडणघडणीत बीडीडी चाळी एक महत्त्वाचा घटक ठरतात. दोन ते तीन पिढ्यांना आश्रय देणाऱ्या या चाळी लवकरच नवीन रूप धारण करतील आणि या प्रकल्पाच्या नियोजनातून मुंबई शहराची नगररचनादेखील सुटसुटीत होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम दर्जेदार 
बीडीडी चाळींमधील रहिवाशांची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेळेत व दर्जेदार होईल. प्रकल्पात येणाऱ्या तांत्रिक अडचणी सरकारने सोडविल्या आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 
सरकारने सोपविलेली जबाबदारी म्हाडा उत्कृष्टरित्या निश्‍चित वेळेत पार पडेल, असे आश्‍वासन अनिल डिग्गीकर यांनी दिले. 

पुनर्विकासाला विरोध करणाऱ्यांना टोला 
सदनिका सोडतीमधील सर्व पात्र भाडेकरूंबरोबर म्हाडा लवकरच करार करणार आहे. या करारात त्यांना निश्‍चित झालेली सदनिका, इमारतीचा क्रमांक, सदनिकेचा मजला नमूद केला जाईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी आपले हितसंबंध जपावेत. मी त्याबद्दल काही बोलणार नसल्याचा टोला त्यांनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नेत्यांना लगावला. राजकारण्यांनी राजकारण करावे. परंतु आम्ही रहिवाशांमध्ये विश्‍वास निर्माण करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi latest marathi news affordable flats outside Mumbai in five years jitendra awhad breaking

loading image