बिबट्यांच्या जीवनशैलीचे रहस्य उलगडणार; नॅशनल पार्कमधील बिबट्याला बसवला 'रेडिओ कॉलर'

बिबट्यांच्या जीवनशैलीचे रहस्य उलगडणार; नॅशनल पार्कमधील बिबट्याला बसवला 'रेडिओ कॉलर'

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) बिबट्याला शनिवारी रात्री  रेडिओ काॅलर लावण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या नॅशनल पार्क मधील वावर आणि मानव-बिबट्या सहसंबधाचा अभ्यास होण्यास मदत होणार आहे. रेडिओ काॅलर लावलेला बिबट्या मादीचे नाव 'सावित्री' असून तिला जंगलात सोडण्यात आले. पुढील काही दिवस तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी सांगितले

मुंबईसह देश विदेशातील प्राणी अभ्यासकांसाठी नॅशनल पार्कमध्ये येत असतात. रेडिओकॉलरच्या माध्यमातून बिबट्यांचे विश्व उलगडणार असल्याने त्याना अनेक बाबिंचा अभ्यास करणे सोपे होणार आहे .तसेच पर्यटकांना बिबट्या कुठे राहतो,काय करतो,कुठे जातो,कसा प्रवास करतो या बाबत कुतूहल असते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील या बिबट्यांचा प्रवास नेमका कसा होतो ते रेडिओ कॉलरच्या माध्यमातून जाणून घेतले जाणार असल्याने ही एक पर्वणी ठरणार असल्याचे मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी 60 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यातील 40 लाख रुपये ही रक्कम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभाग तर 20 लाख रुपयांचा खर्च वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेकडून केला जाणार आहे.

बिबट्यांच्या दैनंदिन हालचालींचा अभ्यास करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाकडून 'लेपर्ड कॉलर हा प्रोजेक्ट राबवला जात आहे . उद्यानातील बिबट्यांना रेडिओ कॉलर लावण्यात येणार आहे. त्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. यातून बिबट्या आणि मानवी संघर्ष याचा अभ्यास ही करता येईल. शहारात अशा प्रकारे पहिल्यांदाच हा प्रयोग होत असून, जी मल्लिकार्जुन सांगतात.

मुंबईच्या आसपास वावरणाऱ्या बिबट्यांचा गेल्या तीन वर्षांपासून कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने अभ्यास सुरू आहे. याच्याच जोडीला आता रेडिओ कॉलर वापरून बिबट्यांमध्ये अधिक माहिती मिळवण्यात येणार आहे. यासंदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया यांच्यामध्ये एक करार ही करण्यात आला आहे. यामुळे आता बिबटया सारख्या बुजऱ्या प्राण्याबद्दल अधिक अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे याची उकल देखील रेडिओ कॉलरमुळे होऊ शकते. परिणामी बिबट्यांच्या व्यवस्थापनासाठीही याची पुढे मदत होऊ शकेल असे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी सांगितले.

असा घेणार शोध :

रेडिओ कॉलरमधून मिळणारे सिग्नल उपग्रहांकडे जातात. त्याची तारीख आणि वेळ याची अचूक नोंद होते. मग ही माहिती अभ्यासकाकडे पाठवली जाते. या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष प्राणी कुठे आहे आणि काय करत आहे याचा शोध घेता येतो. यातून बिबट्यांचा जंगलात वावर नेमका कसा असतो हे समजण्यासाठी होणार आहे. या माध्यमातून उद्यानाचे व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे शक्य होईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

  • -बिबट्या आणि माणसे यांच्यातील परस्परक्रिया कशा होतात हे समजून घेणे.
  • -बिबट्या आणि माणसे एकमेकांशी कशाप्रकारे जुळवून घेतात याविषयी माहिती मिळविणे.
  •  
  • -बिबटे घोडबंदर रोडसारखे मोठे रस्ते कसे ओलांडतात हे जाणून घेणे
  •  
  • -संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जागा आणि वेळ यांचा वापर बिबटे कशाप्रकारे करतात याची माहिती मिळविणे.
  •  
  • -मानव-बिबटे यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी सूचना देणे.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi latest news leopards lifesty radio collar live update 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com