500 BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी होण्याच्या मार्गावर

500 BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी होण्याच्या मार्गावर

मुंबई : मुंबईत BMC कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धत अवलंबली गेलीय. पण त्यानंतर मुंबईतील अनेक BMC कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय. मुंबईतील D वाॅर्ड मधल्या जवळजवळ 500 कर्मचाऱ्यांना याचा फटका अजूनही बसतोय. यातील काहींना त्यांचा गेल्या काही महिन्याचा पगार मिळालेला नाही, तर काहींना पगार फार अनियमितपणे येत असल्याच्या तक्रारी आहेत. मुंबईतील D वाॅर्ड हा ताडदेव आणि मलबार हिल भागातील आहे.   

नुकत्याच कोल्हापुरात आलेल्या पुरामुळे हे सर्व कर्मचारी कोल्हापुरात बचावकामासाठी गेले होते. दरम्यान वारंवार तक्रारी करूनही यांना पगार मिळालेला नाही. नुकतंच BMC आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बचावकार्यात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एका महिन्याच्या अधिकच्या पगाराची घोषणा केली होती, हि रक्कम या कर्मचाऱ्यांना मिळाली आहे.  

BMC मधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थकीत रक्कम पुढच्या पगारासोबत येणार असल्याचं समजतंय.   

BMC मध्ये कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धत अवलंबली गेलीय. मात्र, याचा फटका अनेक BMC कर्मचाऱ्यांना बसलेला पाहायला मिळाला. अनेकांचे पगार अनियमित होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यात. सप्टेंबर महिन्याच्या येणाऱ्या पगारात अनेकांना फक्त 290 रुपये आलेत.     

"जे कर्मचारी कोल्हापुरात मदतकार्यास गेले होते त्यांना अधिकचा पगार मिळालाय, मात्र त्या व्यतिरिक्त अनेकांना त्यांचा पगार नियमितपणे मिळत नाहीये. या कर्मचाऱ्यांनी करायंच काय ?", असा सवाल मुंबई मजदूर युनियनचे अधिकारी विचारतायत.     

दिवाळी तोंडावर आलीये, अशातच जर आताही पगार आला नाही तर या 500 BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी होणार आहे.

WebTitle : marathi news 500 bmc workers from d ward facing irregular salaries

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com