
मुंबई, ता. 14 : राज्यभरात निवडणुकाच्या प्रचाराचा रंग चांगलाच चढलाय. यातच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पहिले ठाकरे 'आदित्य' यांना राज्यभरात स्टार प्रचारक म्हणून राज्यभर फिरावं लागतंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघाची धुरा शिवसेनेचे माजी आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिकांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. शिवसेना नेतृत्वाने प्रत्येक नेत्यावर जबाबदारी दिली असून त्यासाठी या नेत्यांनी वरळीमध्ये ठाण मांडलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रत्यक्ष मतदानाला केवळ आठवड्याभराचा कालावधी उरला आहे. यामुळे प्रचाराला चांगलाच जोर चढला आहे. आदित्य ठाकरे यांनी तर वरळी मतदारसंघ आपली उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच जोरदार प्रचार सुरू केला. आदित्य हे निवडणूक लढवणारे पाहिले ठाकरे असल्याने सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे.
आदित्य ठाकरे हे उमेदवार असले तरी ते शिवसेनेचे स्टार प्रचारक ही आहेत. त्यामुळे त्यांना राज्यात सर्व ठिकाणी प्रचाराला जावे लागत आहे. अशावेळी आदित्य ठाकरेंच्या स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून रणनीती आखण्यात आली आहे.वरळी विधानसभा क्षेत्रात सहा नगरसेवक शिवसेनेचे आहेत. या ठिकाणी सुनील शिंदे हे शिवसेनेचे आमदार होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते सचिन अहिर देखील शिवसेननेत दाखल झाले आहेत.
वरळी विधानसभा मतदार संघातील सहा नगरसेवक, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार व राज्यमंत्री सचिन अहिर यांचा कार्य अहवाल घरोघरी मतदारांकडे पोहचवला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी मतदारांना आवाहन केलेली पत्रही घरोघरी पोहचवल जात आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. याची सर्व जबाबदारी नगरसेवक, नगरसेविका, माजी आमदार आणि शिवसैनिकांवर असल्याची माहिती विभाग प्रमुख नगरसेवक आशिष चेंबूरकर आणि महिला विभाग प्रमुख नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिली.
WebTitle : marathi news big shivsena leaders in worli to campaign for aaitya thackeray
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.