कर्करोगग्रस्त रुग्णांची हॉस्पिटलमधील गर्दी वाढली, कोरोनाचा आणि वाढत्या रुग्णसंख्येचा संबंध काय ?

कर्करोगग्रस्त रुग्णांची हॉस्पिटलमधील गर्दी वाढली, कोरोनाचा आणि वाढत्या रुग्णसंख्येचा संबंध काय ?
Updated on

मुंबई : कोरोना काळात लावल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे कर्करुग्णांच्या उपचारांत घट झाल्याचे दिसून येत होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कर्करुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.  

ज्या रुग्णांनी कोरोनामुळे उपचार टाळले किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली नाही असे रुग्ण पुन्हा टाटा रुग्णालयात परतू लागले आहेत. ज्यामुळे, गेल्या दोन महिन्यांत कर्करुग्णांची संख्या रुग्णालयात वाढू लागली आहे. डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत जवळपास 95 टक्क्यांनी रुग्णवाढ झाली आहे. तर या वर्षी जानेवारी महिन्यात रुग्ण परतण्याची टक्केवारी 110 वर पोहचली आहे.

लॉकडाऊनच्या काळात म्हणजे एप्रिल महिन्यातच कर्करुग्णांना सेवा सुरु ठेवण्याबाबत निवेदन डॉ. राजेंद्र बडवे यांनी निवेदन दिलं होतं. अन्यथा रुग्णांवर आघात होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, आता सर्व सुरळीत असताना वाढलेली रुग्ण संख्या म्हणजे थांबलेल्या रुग्ण सेवेचा परिणाम असल्याचे कर्करुग्ण तज्ज्ञ सांगत आहेत.

फाॅलोअप रुग्णांची जास्त गर्दी - 

रुग्णालयात आता नवीन आणि जुन्या रुग्णांची गर्दी होत आहे. आता हळुहळु रुग्ण वाढले आहेत. कोविड काळातही उपचार केले गेले. रुग्णांनी ऑनलाईन सल्ला ही घेतला. ज्याचा फायदा म्हणून त्यांचा प्रवास वाचला आणि त्यांना डाॅक्टरांकडून योग्य मार्गदर्शन ही मिळाले. 

एस.एच.जाफरी, जनसंपर्क अधिकारी, टाटा मेमोरियल रुग्णालय , मुंबई

गेल्या दोन महिन्यात टाटा मेमोरियल रुग्णालयात कर्करुग्णांची टक्केवारी वाढत असलेली माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परळच्या टाटा रुग्णालयात वर्षाला 45  हजार रुग्ण उपचारांसाठी नोंद करतात. मात्र, या वर्षी 30 हजार रुग्ण संपर्कातून उपचार करत असल्याचे टाटा हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे.

टाटा रुग्णालयात देशभरातून कर्करोगग्रस्त रुग्ण येत असतात. यात उत्तर भारतातून येणाऱ्या  रुग्णांची संख्या अधिक असते. या वर्षी कोरोनाचा परिणाम म्हणून बहुतेक रुग्ण आलेच नाहीत.  आता दोन महिन्यांपासून रुग्ण येत आहेत.

गेल्या वर्षी जागतिक कर्करोग दिनानिमित्त (4 फेब्रुवारी) जागतिक आरोग्य संघटनेने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये भारतात कर्करोगाचे अंदाजित 1.16  दशलक्ष  रुग्ण आढळले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, 10 भारतीयांपैकी एकाला त्यांच्या आयुष्यात कर्करोग होण्याची शक्यता आहे आणि 15 पैकी एक जण या रोगामुळे मरण पावतो. दरम्यान, कोविड काळात रुग्णालयाने सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला नाही कारण इतर देशांपेक्षा हा विषाणू भारतात हळू हळू पसरत होता. 

त्यानंतर, कोविड केसेस वाढल्यानंतर रुग्णालयाने अनेक रक्त संक्रमण किंवा दीर्घकाळापर्यंत आयसीयूवर राहणार्या आणि जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असलेल्या जटिल शस्त्रक्रिया टाळण्याचे ठरवले. तसंच,  ओपीडी आणि रूग्णांच्या वॉर्डातील नातेवाईकांना प्रतिबंध घालण्यात आले. 

दरवर्षी सुमारे 70,000 नवीन आणि जुन्या कर्करोगाच्या रूग्णांवर उपचार केले जातात. परंतु, गेल्या वर्षी अनेक रूग्णांनी दूरध्वनी किंवा व्हिडिओ सल्ला घेतल्यामुळे एकूण संख्या उपलब्ध नाही. 

marathi news cancer patients count in hospital visits increase after fear of covid reduced

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com