पनवेलकर तापले.. आता No water, No Vote!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नवी मुंबई :: नवी मुंबईतल्या द स्प्रिंग सोसायटीनं नो वॉटर नो वोट अभियान सुरु केलंय. सिडकोच्या या सोसायटीमध्ये मागील 19 दिवसांपासून पाण्याचा थेंबही आलेला नाही. सिडको ऑफिसला याविषयी तक्रार करुनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे पाणी मिळालं नाही तर मतदान करणार नसल्याचं इथल्या स्थानिकांनी ठरवलंय. 

तळोजा, कळंबोली, रोडपाली या भागातील लोकांना प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पनवेल महानगर पालिका आणि सिडको कडून पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे होत नसल्याचा इथल्या रहिवाश्यांचा आरोप आहे. म्हणूनच इथल्या नागरिकांनी आता बॅनर बाजी करत थेट निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय.  

संबंधित भागातील रहिवाशांना पाणी येत नसल्याने इथल्या नागरिकांना टॅंकरचं पाणी मागवावं लागतंय. सतत टॅंकरने पाणी मागवल्याने सोसायटी आणि अनुक्रमे सर्व नागरिकांना याचा आर्थिक फटका बसतोय. याबाबतील अनेकदा पनवेल महापालिकेकडे तक्रार केली असल्याचं नागरिकांनी सांगितलंय. मात्र याबाबतीत कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही असं नागरिक सांगतायत. 

दरम्यान, या सगळ्या प्रकारचा मोठा फटका हा इथल्या नागरिकांना बसतोय. त्याचबरोबर फक्त टॅंकरमाफियांचा फायदा होण्यासाठीच पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. 

WebTitle : marathi news citizens of panvel decides to ban election due to water issues

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news citizens of panvel decides to ban election due to water issues