"..पण 'निकम्मा' कुठंय ?"  संजय निरुपम यांचा मिलिंद देवरांवर निशाणा ?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

नुकतंच निरुपम यांनी कॉंग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 

मुंबई : कॉंग्रेसचे नाराज नेते संजय निरुपम सध्या कॉंग्रेसवर निशाणा साधण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीयेत. राहुल गांधी यांची मुंबईत सभा पार पडली. यात संजय निरुपम अनुपस्थित होते. दरम्यान राहुल गांधीच्या सभेदरम्यान निरुपम कुठे होते? असे वारंवार प्रश्न विचारले जात होते. यावर संजय निरुपम यांनी मौन सोडलंय. "मी माझ्या पारिवारिक कामानिमित्ताने रात्रीपर्यंत बिझी असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय. 

"मुंबईत माझ्याविरोधात अनेक अफवा उठवल्या जातायत. माझ्यावरील आरोप हे बिनबुडाचे आहेत. मी माझ्या पारिवारिक कामानिमित्ताने पूर्ण दिवसभर व्यस्त होतो, याबद्दल मी त्यांना ( राहुल गांधी ) आधीच कळवलं होतं. ते (राहुल गांधी ) माझे नेते आहेत आणि कायम राहतील. असं संजय निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय. 

दरम्यान पुढे त्यांनी तो 'निकम्मा' का गैरहजर होता? असाही सवाल उपस्थित केलाय.

 

 

आता, संजय निरुपम हे नेमके कोणत्या नेत्याबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्टपणे लिहिलं जरी नसलं तरीही सोशल मिडियावर निरुपम यांनी मिलिंद देवरा यांच्यासाठीच हे लिहिलं असल्याचं बोललं जातंय.   

गेले काही दिवस संजय निरुपम हे कॉंग्रेसवर नाराज आहेत. नुकताच त्यांनी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सोनिया गांधी याचे निकटवर्ती मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरदेखील निशाणा साधला होता. दरम्यान अद्याप निरुपम यांनी काँग्रेसला सोड्चीठ्ठी दिलेली नाही. 

WebTitle : marathi news disgruntled congress leader sanjay nirupam targets milind deora


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news disgruntled congress leader sanjay nirupam targets milind deora