कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीचे अंदाज पत्रक सादर

रविंद्र खरात
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2017- 18 चे सुधारीत अंदाजपत्रक जमा 85 कोटी 49 लाख 38 हजार रुपये ,तर खर्च 82 कोटी 99 लाख 6 हजार रुपये,  शिल्लक 2 कोटी 50 लाख 6 हजार रुपये, तर सन 2018-2019 मूळ अंदाज जमा 104 कोटी 88 लाख 2 हजार रुपये, खर्च 102 कोटी 20 लाख 86 हजार रुपये, शिल्लक 2 कोटी 67 लाख 16 हजार रुपयाचे अंदाज पत्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी आज मंगळवारी (ता. 2) परिवहन समिती आणि सभापती संजय पावशे यांना  सादर केले.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2017- 18 चे सुधारीत अंदाजपत्रक जमा 85 कोटी 49 लाख 38 हजार रुपये ,तर खर्च 82 कोटी 99 लाख 6 हजार रुपये,  शिल्लक 2 कोटी 50 लाख 6 हजार रुपये, तर सन 2018-2019 मूळ अंदाज जमा 104 कोटी 88 लाख 2 हजार रुपये, खर्च 102 कोटी 20 लाख 86 हजार रुपये, शिल्लक 2 कोटी 67 लाख 16 हजार रुपयाचे अंदाज पत्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी आज मंगळवारी (ता. 2) परिवहन समिती आणि सभापती संजय पावशे यांना  सादर केले. सदर अंदाजपत्रक मध्ये मागील अंदाज पत्रकाच्या कामाची रीघ ओडली असून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस देविदास टेकाळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त  केला आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीची आज (ता. 2) सकाळी 11 वाजता पालिका मुख्यालयात सभा संपन्न झाली, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2017-18 चे सुधारीत अंदाजपत्रक जमा 85 कोटी 49 लाख 38 हजार रुपये, तर खर्च 82 कोटी 99 लाख 6 हजार रुपये, शिल्लक 2 कोटी 50 लाख 6 हजार रुपये, तर सन 2018-2019 मूळ अंदाज जमा 104 कोटी 88 लाख 2 हजार रुपये, खर्च 102 कोटी 20 लाख 86 हजार रुपये, शिल्लक 2 कोटी 67 लाख 16 हजार रुपयाचे अंदाज पत्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी आज मंगळवारी परिवहन समिती आणि सभापती संजय पावशे यांना सादर केले कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम दिवसेंदिवस डबघाईला जात असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनुदानाशिवाय केडीएमटीची बस पुढे धावू शकत नाही. मागील आठ महिन्यात केडीएमटीला 13 कोटी 25 लाख रुपये अनुदान मिळाले असून आगामी वर्षात 29 कोटी 75 लाखांचे अनुदान महानगर पालिकेकडे मागितले, असून किती अनुदान पालिका देते त्यावर परिवहनाचा कारभार चालणार आहे, यामुळे नवीन वर्षात रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केडीएमटी प्रशासनला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.  

अच्छे दिन कधी येणार
स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने परिवहनसाठी 32 कोटी 25 लाखांची तरतूद केली असून आगामी वर्षात अन्य परिवहनच्या तिकिटाचा सर्वे करून तिकीट भाडे वाढ होण्याची शक्यता असून मागील वर्षाप्रमाणे त्याच घोषणा अंदाज पत्रकात असून  महिलांसाठी विशेष बससेवा, खासगीकरणातून नोकर भरती, डेपो नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमरा बसविणे, आदींचा समावेश केला असला तरी मागील वर्षी सादर केलेल्या अंदाज पत्रकातील कामाचा री ओढला असून पालिका अनुदान देईल त्यावरच ही कामे पूर्ण होतील हे चित्र समोर आले आहे. अन्य परिवहन उपक्रमाशी स्पर्धा करण्यासाठी एकही घोषणा न केल्याने उपन्न कसे वाढणार याकडे लक्ष लागले असून प्रवासी वर्गाचे अच्छे दिन कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Marathi news kalyan news kalyan dombivali muncipal corporation transport committee budget