esakal | Raj Thackeray Ayodhya Visit | राज ठाकरे यांची अयोध्या वारी ठरली
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray Ayodhya Visit |  राज ठाकरे यांची अयोध्या वारी ठरली

आज मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बेठकीला राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

Raj Thackeray Ayodhya Visit | राज ठाकरे यांची अयोध्या वारी ठरली

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत. आज मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बेठकीला राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन 9 मार्च रोजी असतो, येत्या मुंबई महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार कंबर कसली आहे. 9 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत मनसे कार्यकर्ते नोंदणी करणार आहेत. 9 मार्च नंतर राज ठाकरे राज्यभर दौरा करणार असल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले. देशभरातून राम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन सुरू आहे. राज यांनीही आपला झेंडा बदलवून आपल्या पक्षाच्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. राज यांची अयोध्या वारी बदलेल्या राजकारणाचा देखील बदलेल्या राजकारणाचा एक भाग असू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर शिवसेनेने हिंदुत्व सौंम्य केले राजकीय विश्लेषक सांगतात. शिवसेनेची रिकामी झालेली हिंदुत्वाची स्पेस राज ठाकरे भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा राजकीय चर्चांना उधान आले आहे. 

---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi news Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray will visit Ayodhya from March 1 to 9