पाठीवर १२ किलो वजन, 2 डिग्री थंड पाणी.. मिलिंदचा गार पाण्यात हॉट वॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पाठीवर तब्बल 12 किलो वजन घेऊन 2 डिग्री सेल्सियस थंडगार पाण्यात मिलिंद सोमण चालतानाचा त्याचा ट्विटरवरचा फोटो तरुणाईला भलताच भावलाय. 

मुंबई : मिलिंद सोमण, वय ५३ वर्ष, पण फिटनेस एखाद्या विशीतल्या तरुणाचाही लाजवेल असा. भारतात कुणाचा फिटनेस पहावा तर तो त्याचाच. सध्या मिलिंद सोमण याचा एक फोटो व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या फोटोमुळे मिलिंद पुन्हा एकदा चर्चेत आलाय. 

पाठीवर तब्बल 12 किलो वजन घेऊन 2 डिग्री सेल्सियस थंडगार पाण्यात मिलिंद सोमण चालतानाचा त्याचा ट्विटरवरचा फोटो तरुणाईला भलताच भावलाय. मुळात स्विमिंग करतानाच अनेकांची दमछाक होते, यात मिलिंद सोमणने पाठीवर तब्बल १२ किलो वजन घेऊन अंडरवाॅटर वॉक केलाय. 

 

 

"तुम्ही ध्येय निश्चित करून त्यादृष्टीनं प्रयत्न करत राहिलात तर ते सहज शक्य आहे. तुम्ही तुमची ध्येयं ओळखा आणि त्या दिशेने प्रवास सुरू करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील दु:ख विसरायलादेखील तुम्हाला त्याची प्रचंड मदत होईल", असं मिलिंद ने त्याच्या ट्विट मध्ये म्हटलंय. यंदा 'दररोज सात तास मॅरेथॉन' असा संकल्प मिलिंदने केलाय. त्याने ट्विट करून आपला संकल्प जाहीर केलाय. #7hourmarathon असा हॅशटॅग देत सर्वांना या त्याच्या अनोख्या फिटनेस संकल्पात सामील होण्याचं आवाहनही मिलिंद सोमण याने केलंय. 

सोशल मिडीयावर अश्या गोष्टी आल्यात की त्या एकतर प्रचंड व्हायरल होतात आणि त्याचा ट्रेंड होतो. मात्र काहीवेळेस सेलिब्रिटीजना ट्रोलींगचा सामना देखील करावा लागतो. प्रत्येकालाच मिलिंद सोमण ने केलेला संकल्प पटलेला नाही. सात तास या गोष्टी केल्यात तर घरच्यांना खायला काय घालायचं असा प्रश्न नेटीझन्सनी मिलिंद सोमणला विचारलाय.  

 

WebTitle : marathi news milind somans new fitness mantra of walking under water for 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news milind somans new fitness mantra of walking under water for