धावत्या लोकलमध्ये प्रसूती, पण स्टेशनवर ऍम्ब्युलन्ससाठी पाहिली एक तास वाट

धावत्या लोकलमध्ये प्रसूती, पण स्टेशनवर ऍम्ब्युलन्ससाठी पाहिली एक तास वाट

मुंबई, ता. 15 : मध्य रेल्वे ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध असल्याचा कितीही दावा करत असली तरीही मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झालाय. धावत्या रेल्वेत प्रसूती झालेल्या एका मातेला ऍम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने नवजात बालकासह चक्क तासभर  वाट पाहावी लागलीये .शेवटी GRP ने या मातेला टॅक्सीने रुग्णालयात दाखल केलं.

सदर घटना आज दुपारच आहे. आठ महिन्यांची गरोदर असणारी ही सबनुर निशा नावाची ही 24 वर्षीय महिला तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात गेली होती. तपासणी नंतर सबनुर रेल्वेने पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघाली. सायन रेल्वे स्थानकात रेल्वे पोहोचताच अचानक सबनुरच्या प्रसूती कळा सुरू झाल्या. मात्र, ट्रेन मधून उतरण्याच्या आधीच सबनुरने धावत्या रेल्वेतच बाळाला जन्म दिला. यानंतर, आई आणि या बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल करणं आवश्यक असतं अशात कुर्ला स्थानाकात सबनुरला तब्बल तासभर बसावं लागलं. 

स्थानकातील रेल्वे मास्तरशी संपर्क केला असता रेल्वे स्थानकात ऍम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचे समोर आले. शेवटी 108 ऍम्ब्युलन्स ला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ती सुद्धा उपलब्ध झाली नाही. या धावपळीत या मातेला आपल्या बाळासह एक तास ताटकळत बसावे लागले. यामुळे सबनुरसह बाळाची तब्येत खराब झाली. शेवटी तासाभरानंतर जीआरपीने टॅक्सीची व्यवस्था करून सबनुरला जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल केले. भाभा रुग्णालयात माता आणि बाळाला ICU मध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र रेल्वेच्या भोंगळ काराभारविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होतोय.

WebTitle : marathi news mumbai local train delivery but where is an ambulance

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com