मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर; आता ट्रेनमध्ये वाय फाय.. 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत मध्य रेल्वेतील 165 लोकामध्ये हे वाय-फाय बसवण्यात येणार आहे. यामध्ये प्री-लोडेड गाणी, मालिका आणि चित्रपटांचा समावेश असेल. ट्रेनमध्ये वाय-फाय लॉगइन करून ही सुविधा वापरता प्रवाशांना वापरता येणार आहे.

मुंबईकरांना रेल्वेतर्फे दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. कारण रेल्वेने मुंबई लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेतलाय. 'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत आता मुंबईच्या लोकलमध्ये वायफाय बसवलं जाणार आहे. दरम्यान या सुविधेमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रेंज नसणे किंवा वारंवार बफरींगचा आता सामना करावा लागणार नाही. 

'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत मध्य रेल्वेतील 165 लोकामध्ये हे वाय-फाय बसवण्यात येणार आहे. यामध्ये प्री-लोडेड गाणी, मालिका आणि चित्रपटांचा समावेश असेल. ट्रेनमध्ये वाय-फाय लॉगइन करून ही सुविधा वापरता प्रवाशांना वापरता येणार आहे. रेल्वेतील वाय-फाय मुळे आता लोकलमध्ये प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची बचत होईल, अशी माहिती  रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 

मध्य रेल्वेने खासगी कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला आहे. प्रवाशांना या सुविधेचा लाभ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेता येणार आहे. 

WebTitle : marathi news mumbai local user will get wifi facility in train through content of demand


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai local user will get wifi facility in train through content of demand