सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर डि.लिट् पदवीने सन्मानित 

Udaykumar Shirurkar
Udaykumar Shirurkar

मुंबई : मुंबई महानगरपालिका बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांना पर्यावरण रक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याबद्दल डि. लिट् पदवीने सन्मानीत करण्यात आले. हा सन्मान त्यांना आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. विठ्ठल मदने यांच्या हस्ते सातारा येथे झालेल्या पदवीदान समारंभात डि.लिट् पदवी प्रदान करण्यात येऊन करण्यात आला. त्यांना डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांचे मार्गदर्शन लाभले होते. या प्रसंगी शशिकांत साळवे, डॉ. मधुसूदन घाणेकर, डॉ. नवनाथ निघोट आदी मान्यवर उपस्थित होते. उदयकुमार शिरुरकर हे अभियांत्रिकी शाखेचे उच्च विद्याविभूषित विद्यार्थी आहेत.

 मुंबई महानगर पालिका बी वॉर्ड येथे ते सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत.
 पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे, त्यासाठी समाजातील सर्व स्तरातून व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याची गरज आहे असे त्यांनी या प्रसंगी सांगितले. कडक शिस्तीचे, भ्रष्टाचार निर्मूलनाचा ध्यास घेतलेले अधिकारी म्हणून ते समाजात लोकप्रिय आहेत. पालिका अधिकारी आणि वर्तुळात त्यांना डी. लिट् पदवी मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com