कंडोमबाबत जागरुकता होण्याची आवश्यकता 

मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

ऑलव्हेज इन फॅशन 
कंडोमचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इण्टरनॅशनल कंडोम दिनाची थीम यंदा कंडोमला फॅशनशी जोडणारी आहे. ऑलव्हेज इन फॅशन अशी थीम यावेळी स्विकारण्यात आली आहे. ज्याप्रमाणे लिपस्टिकमध्ये लाल रंग कायम फॅशनमध्ये असतो. त्याप्रमाणे कंडोमही फॅशनमध्ये (वापरात) असला पाहिजे असा विचार या थीममागे आहे.

मुंबई : भारतीय समाजात कंडोमबाबत जागरुकता होण्याची आवश्यकता आहे. त्यातही एलजीबीटीक्यूआय समुदायात यावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञ आणि या समुदायासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचे सहाय्यक संचालक डॉ. नरेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण एलजीबीटीक्यूआय समुदायात इतर समुदायाच्या तुलनेत जास्त आहे. या समुदायातील लोक कंडोम न वापरण्यासाठी अनेक कारणे पुढे करत असल्याचे एड्स हेल्थकेअर फाउंडेशनचे प्रकल्प संचालक डॉ. व्ही सॅम प्रसाद यांनी सांगितले. 

एकूणच भारतीय समजात कंडोमबद्दल जनजागरुती होण्याची आवश्यकता आहे. देशातील तरुणांची लोकसंख्या 65 टक्के आहे. ज्यानुसार लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत केवळ कंडोम प्रमोट करण्याऐवजी त्यांच्या वापरातून होणाऱ्या फायद्यांवर भर देणे आवश्यक आहे. प्रत्येक वयोगटासाठी जनजागरुतीचे वेगळे प्रयोग आणि माहिती उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. वेगळ्या वयोगटासाठी कंडोमचे असणारे फायदे लोकांना सांगून कंडोमच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही एलजीबीटीक्यूआय समुदायात जागरुतीवर अधिक भर देणे आवश्यक आहे. या समुदायात याबाबत जागरुकता असली तरी आरोग्यासाठी कंडोम या बाबत या समुदायात फारशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. या समुदायातील सर्वाधिक व्यक्ती या अनेक पार्टनरसोबत शरिरसंबंध ठेवतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी कंडोम हा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असे ते म्हणाले. मुंबई एड्स कंट्रोल सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली.   

एड्स हेल्थकेअर फाउंडेशनचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि लक्ष्य ट्रस्टच्या माध्यमातून गे आणि हिजडा कम्युनिटीसाठी गुजरातमध्ये काम करणारे प्रिन्स मानवेंद्र सिंघ गोहील यांनी देखील एलजीबीटीक्यूआय समुदायामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले. तसेच याबाबत समुदायात गैरसमज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2001 पासून गुजरात सरकारच्या मदतीने राजकोट, बडोदा आणि गुजरात या भागामध्ये समुदायासाठी मोफत कंडोम उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले.  समुदायातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी करण्यात येणाऱ्या कामाचा एक भाग म्हणून कंडोम उपलब्ध करुन देण्यात येतात. समुदायातील लोकांचे लैंगिक संबंध येणाऱ्या ठिकाणी कंडोम्स उपलब्ध होतील याची काळजी घेण्यात येते. कुटूंबियांबरोबर राहणाऱ्या अनेकांसाठी कंडोम स्वतःबरोबर बाळगणे आव्हानात्मक असते. अशांना घरातून त्रास होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यांच्या लैंगिक कृती होत असलेल्या ठिकाणी कंडोम उपलब्ध झाल्यास त्यांचा वापर वाढू शकतो. गुजरात सरकारच्या माध्यमातून असा प्रयोग केला ज्याचे चांगले परिणाम दिसले असेही त्यांनी सांगितले. झाडांना कॉण्डम लावून ठेवणे, स्वच्छतागृहाच्या चौकीदाराकडे ते देऊन ठेवणे यासारखे उपाय केल्यामुळे समुदायात कंडोमचा वापर वाढला तसेच लैंगिंक संबाधातून होणाऱ्या आजारांचे प्रमाण घटायला मदत झाली असे ते म्हणाले. देशाच्या इतर भागातील समुदायासाठी अशा पद्धतीने कंडोम उपलब्ध होण्याची आवश्यकता असलल्याचे प्रिन्स मानवेंद्र यांचे मत आहे.  

ऑलव्हेज इन फॅशन 
कंडोमचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इण्टरनॅशनल कंडोम दिनाची थीम यंदा कंडोमला फॅशनशी जोडणारी आहे. ऑलव्हेज इन फॅशन अशी थीम यावेळी स्विकारण्यात आली आहे. ज्याप्रमाणे लिपस्टिकमध्ये लाल रंग कायम फॅशनमध्ये असतो. त्याप्रमाणे कंडोमही फॅशनमध्ये (वापरात) असला पाहिजे असा विचार या थीममागे आहे.

Web Title: Marathi news Mumbai news Condom use in LGBT community