हिंदूद्रोही समाजकंटकाच्या अटकेची हिंदू महासभेची मागणी

पूनम कुलकर्णी 
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करण्याची मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष अनुप केणी यांनी दादर येथे निदर्शने करताना केली. या प्रसंगी ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर संभाजीनगर येथे सावरकर पुतळ्याची विटंबना करत राज्यात सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कले जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे.त्यांच्या स्मृतींचे जतन करण्याची आवश्यकता असताना, त्यांच्या स्मृतींची विटंबना होणे हे संपूर्ण महाराष्ट्राला लांछनास्पद आहे.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करण्याची मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष अनुप केणी यांनी दादर येथे निदर्शने करताना केली. या प्रसंगी ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर संभाजीनगर येथे सावरकर पुतळ्याची विटंबना करत राज्यात सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कले जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे.त्यांच्या स्मृतींचे जतन करण्याची आवश्यकता असताना, त्यांच्या स्मृतींची विटंबना होणे हे संपूर्ण महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. पुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविणेसारख्या घटना करणारे दैदिप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत. हे समाजकंटक राष्ट्रद्रोही त्याचप्रमाणे हिंदूद्रोही असल्याचे ते म्हणाले.

12 मार्च 1993 च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटातील आरोपींना पकडण्यात शासनाला अपयश आले. हेच आरोपी देशाच्या सीमेवर युध्द सद्दृश्य परिस्थिती निर्माण करत आहेत. परंतु देशात सामाजिक अशांतता निर्माण करणारे कोण आहेत हे माहित असुनही भाजप सेनेची केंद्र आणि राज्यातील सरकारे त्यांचे लांगुन चालन करण्यात धन्यता मानत असल्याचे दिनेश भोगले म्हणाले.

याप्रसंगी महेश सावंत- पटेल, दिलीप मेहेंदळे आणि क्रांतीगीता महाबळ यांची भाषणे झाली. यावेळी दादर कबुतरखाना येथील चौक सभेत भाषण करतांना हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष अनुप केणी, हिंदू सभाई, निसर्ग उपचार तज्ञ श्रीमती संगीता अमलाडी आदी उपस्थित हिंदू महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Marathi news mumbai news statue hindu spoilers