दादरमध्ये आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

पूनम कुलकर्णी
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई : भीमा कोरेगाव येथील दंगलीनंतर भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या बंदला मुंबईत बुधवारी सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी देखील शहरातले जनजीवन विस्कळीत झाले. प्रामुख्याने मुंबईकरांची लाइफलाइन असलेली मुंबईची लोकल आंदोलकांनी ठिकठिकाणी रोकल्यामुळे या बंदचा त्रास सामान्य नागरीकांनी आणि चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. मुंबई शहरातील अत्यंत गर्दीचे आणि महत्वाचे असलेले दादर रेल्वे स्थानक देखील आंदोलकांनी घोषणा देत दणाणून सोडले.

दादर रेल्वे स्थानकात फक्त घोषणा न देता प्लॅटफॉर्म ५ आणि ६ वर कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात करत रेल्वे ट्रॅकवर उतरुन आंदोलन केले. दादर रेल्वे स्टेशनवर आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले पहायला मिळाले. दादरमध्ये आंदोलकांनी सायन आणि परेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बराच वेळ रोखून धरली होती. पोलिसांनी या आंदोलकांना हटवल्यानंतर आंदोलक दादर रेल्वे स्थानकांच्या दिशेने गेले. रेल्वे स्थानक परिसरात घुसताना या आंदोलकांना पोलिसांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला परंतु पोलिसांबरोबर संघर्ष झाल्यानंतर हे आंदोलक रेल्वे स्थानक परिसरात घुसले.

आंदोलकांनी मध्य आणि पश्चिम  दोन्ही मार्गावर रेल रोको आंदोलन केले. हे आंदोलन काही वेळ सुरु होते परंतु दादर स्थानकातील परिस्थिती पूर्वपदावर यायला जवळपास १ तासाचा अवधी जावा लागला. पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरुन हटवल्यानंतर बाहेर येऊन आंदोलकांनी दादर पूर्व येथील स्वामी नारायण परिसरात घोषणाबाजी करुण आंदोलन समाप्त केले. दादर येथे झालेल्या या आंदोलनात महिला व लहान मुले मोठया संख्येने सहभागी झाली होती.

Web Title: Marathi news mumbai news strike in dadar