वरळीत महाराष्ट्र बंदचे पडसाद

पूनम कुलकर्णी
बुधवार, 3 जानेवारी 2018

वरळी : भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रभऱ उमटल्याचे चित्र गेल्या २-३ दिवसात पहायला मिळाले. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अनुयायांवर दगड फेक झाल्यामुळे या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटलेले पहायला मिळाले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन २ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर अनेक संघटना, दलित पक्षांनी या महाराष्ट्र बंद मध्ये सहभाग घेतला

या महाराष्ट्र बंदचे पडसाद महाराष्ट्र भरात पहायला मिळाले. ३ जानेवारी रोजी वरळी नाका परिसरात आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे तणाव सदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी वरळी नाक्यावर आंदोलकांनी रस्त्यावर बेस्ट बस गाड्या आडवल्या. तसेच अनेक महिला आंदोलक रस्त्याच्या मध्यभागी बस समोर बसल्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वरळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करुनही या ठीकानी वरळी नाक्याच्या दिशेने जाणा-या वाहनांची कोंडी पहायला मिळाले. कॉ. कुरणे चौक, वरळी दुरदर्शनच्या दिशेने याणाऱ्या गाड्या अडवल्यामुळे बराचवेळ वरळीकरांना या बंदमुळे वाहतूकीच्या अडचणीचा सामना करावा लागला.

बस पुढे जाऊ न देण्याचा निर्धार महिला कार्यकर्त्यांनी केल्यामुळे बराच वेळ रस्त्यावर बसलेला महिलांनी घोषणा बाजी करत परिसर दणाणून सोडल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. या परिसरात आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊ नये यासाठी वारवार पोलीसांकडून शांततेचे आवाहन करण्यात येत होते. बराच वेळ वरळी नाका परिसरात उभ्या असलेल्या बस गाड्या पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलकांनी पुढे सोडल्या. 

Web Title: Marathi news mumbai news warali strike