महिलांनी सक्षम होणे काळाची गरज- प्रा. वैशाली बनकर

पूनम कुलकर्णी
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई : आंबेडकर भवन ट्रस्ट वरळीच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर, विभागातल्या सर्वसामान्य नागरीकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, जून महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप, नोकरी मार्गदर्शन शिबीर, क्रिडा स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले जातात.

मुंबई : आंबेडकर भवन ट्रस्ट वरळीच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर, विभागातल्या सर्वसामान्य नागरीकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, जून महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप, नोकरी मार्गदर्शन शिबीर, क्रिडा स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले जातात. गुरुवार 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक सकाळ आणि आंबेडकर भवन ट्रस्ट वरळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिन विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आंबेडकर भवन ट्रस्ट कडून गुरुवारी वरळी विभागातल्या महिलांसाठी स्तन तपासणी, गर्भाशयाशी संबंधित कर्करोगाची छाननी पोद्दार हॉस्पीटल मधील नामांकीत डॉक्टरांद्वारे फक्त महिलांसाठी आरोग्य जागरुकता शिबीराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात वरळी पोलिस ठाण्याच्या उप निरीक्षक ज्योती शेंडकर, प्रयास संस्थेच्या असिस्टंट डायरेक्टर प्रज्ञा शिंदे, दैनिक सकाळच्या पत्रकार पूनम कुलकर्णी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वैशाली परुळेकर, कोकीलाबेन आंबानी हॉस्पिलच्या फिजीओथेरेपीस्ट मिली बनसोडे, मुंबई विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ वंदना महाजन, कमला मिल आग प्रकरणात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचविणारे वरळीचे पोलिस शिपाई सुदर्शन शिंदे  यांच्यासह त्यांच्या पत्नी सुवर्णा शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमात जिल्हा महिला बालविकास उपायुक्त महाराष्ट्र शासन राहुल मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आनंदकुमार पाटील यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक वैशाली बनकर उपस्थित राहिल्या होत्या. मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या वैशाली बनकर उपस्थित महिलांशी संवाद साधताना म्हणाल्या, महिला सक्षम होणे काळाची गरज आहे. महिला सक्षम झाल्या तरच त्यांच्यावर होणाऱ्या आत्याचाराला आळा बसेल. आजच्या काळात महिलांवर आत्याचार होऊ नयेत म्हणून महिलांनी शारीरिक, मानसिक आणि अर्थिक दृष्ट्या सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव संस्थेकडून होणे ही संस्थेसाठीही गौरवाची बाब आहे. यापुढेही संस्थेकडून महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याचा गौरव दरवर्षी केला जाईल. दररोज मेहनत घेणाऱ्या  महिलांना महिला दिनानिमित्त कायमच आमच्या ट्रस्ट कडून शाब्बासकीची थाप मिळेल यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन. संस्थेत कार्यरत असलेल्या महिलांच्या हस्ते महिलांचा गौरव करून संस्थेत कार्यरत असलेल्या महिलांचा ही यावेळी सन्मान केला. वर्षभर रोज काम करणाऱ्या महिलांना वर्षातून एक दिवस संस्थेकडून कौतुकाची थाप मिळावी म्हणून यापुढेही महिला दिन असाच उत्साहात साजरा केला जाईल, आंबेडकर भवन ट्रस्ट वरळीचे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सांगितले. 

 

Web Title: Marathi news mumbai news women have to be strong womens day