प्रयास सेवाभावी संस्थेचा नारी शक्तीला सलाम

पूनम कुलकर्णी
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रयास सेवाभावी संस्थेच्या वतीने मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकावरील सर्व महिला अधिकाऱ्यांचा गुरुवार 8 मार्च रोजी सत्कार करण्यात आला. माटुंगा रेल्वे स्थानक हे भारतातील असे पहिले स्थानक आहे की, जेथे सर्व पदांवर  महिला कार्यरत आहेत. दररोज या महिला आतिशय प्रभावीपणे व सुरळीतपणे महिला अधिकारी आपली जबाबदारी बजावत असताना पहायला मिळतात. महिला दिनानिमित्त असे उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे कौतुक म्हणून त्यांना प्रयासच्या कार्यकर्त्यांनी भेट देत संवाद साधला आणि सत्कार देखील केला.

पुरुषांची मक्तेदारी मोडत स्त्रीसुध्दा सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलु शकतात हे माटुंगा स्थानकातील या महिलांचे कामकाज पाहिल्यानंतर समजते. रोज नियमित आपली ड्युटी बजावणाऱ्या या महिलांना कौतुकाची थाप मिळावी म्हणुनच सर्व सशक्त नारींचा सन्मान प्रयास सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रयास सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Marathi news mumbai news womens day by prayas